सेनेच्या बैठकीत नाराजीनाट्य

By Admin | Updated: November 6, 2016 00:57 IST2016-11-06T00:53:14+5:302016-11-06T00:57:02+5:30

उस्मानाबाद : येथील नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संपर्कप्रमुख गौरीष शानबाग यांच्या उपस्थितीत शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

In the Senate meeting, Narasimetya | सेनेच्या बैठकीत नाराजीनाट्य

सेनेच्या बैठकीत नाराजीनाट्य

उस्मानाबाद : येथील नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संपर्कप्रमुख गौरीष शानबाग यांच्या उपस्थितीत शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नाराजीनाट्य चांगलेच रंगले. बैठकीच्या प्रारंभीच माजी नगराध्यक्ष प्रदीप साळुंके यांनी थेट माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावरच निशाणा साधला. राष्ट्रवादीतून आणून ऐनवेळी मकरंद राजेनिंबाळकर यांना दिलेली उमेदवारी आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. युवासेना जिल्हा प्रमुख सूरज साळुंके यांच्याही आचरणातून यावेळी नाराजी दिसून आली. विशेष म्हणजे जिल्हा प्रमुख, सहसंपर्क प्रमुख यांची या बैठकीला उपस्थिती नव्हती.
बैठकीसाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख गौरीष शानबाग, खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी जिल्हाध्यक्ष भारत इंगळे, माजी नगराध्यक्ष प्रदीप साळुंके, संजय निंबाळकर, पप्पु मुंडे, युवा सेना जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठक सुरू झाल्यानंतर काही क्षणातच प्रदीप साळुंके यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत नाराजीचा सूर आळवला. ओमराजे शिवसेनेत आल्यापासूनच पक्षात गटबाजी वाढल्याचे सांगत, वर्षानुवर्ष सेनेचे काम करणाऱ्या शिवसैनिकाला डावलून ऐनवेळी राष्ट्रवादीच्या मकरंद राजेनिंबाळकर यांना दिलेली उमेदवारी आम्हाला मंजूर नसल्याचे ते म्हणाले. मागील पाच वर्षात ओमराजे निंबाळकर आमदार असताना तसेच त्यांच्या ताब्यात झेडपी असताना त्यांनी कुठल्या शिवसैनिकांना न्याय दिला? असा खडा सवालही त्यांनी केला. शिवसेनेचे संपर्कप्रमुख शानबाग मार्गदर्शन करण्यासाठी उभे राहिल्यानंतर त्यांनी ‘माझ्या मनातही शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर पाटील हेच असल्याचे सांगताच नगरसेविका प्रेमाताई पाटील यांनी त्यांच्या या वक्त व्यावर आक्षेप घेतला. ‘शानबाग साहेब, अण्णाचे नाव घेऊ नका. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नव्हती’, असे त्या म्हणाल्या. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सुरज साळुंके शेवटच्या टप्प्यात बैठकस्थळी हजर झाले. बैठकस्थळी आल्यावरही ते मंचाकडे न जाता कार्यकर्त्यांसाठीच्या खुर्चिवर जावून बसले. त्यावर मंचावर उपस्थित शानबाग, ओम राजेनिंबाळकर यांनी मंचावर येण्यास सांगितल्यानंतर ते मंचावर गेले. दरम्यान, खा. रवींद्र गायकवाड यांनी बोलाविलेल्या या बैठकीमध्ये गटबाजीचे प्रदर्शन झाले. पालिका निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या विषयावर बोलावलेल्या बैठकीस खुद्द जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांच्यासह सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचीही गैरहजेरी होती. एकूणच जुने आणि नवे शिवसैनिक यांच्यात दरी निर्माण झाल्याचे या बैठकीतून समोर आले. ही दरी शिवसेनेचे उपनेते प्रा. तानाजी सावंत कशा प्रकारे दूर करतात? हे पाहणे आता आत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: In the Senate meeting, Narasimetya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.