स्वखर्चाने रोप निर्मिती!

By Admin | Updated: March 18, 2017 00:12 IST2017-03-18T00:10:57+5:302017-03-18T00:12:29+5:30

दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील ग्रा.पं. कर्मचारी रमेश कनगरे यांनी स्वखर्चातून सुमारे साडेतीन हजार विविध जातीच्या रोपांची निर्मिती केली आहे.

Self-propagation of the plant! | स्वखर्चाने रोप निर्मिती!

स्वखर्चाने रोप निर्मिती!

दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील ग्रा.पं. कर्मचारी रमेश कनगरे यांनी स्वखर्चातून सुमारे साडेतीन हजार विविध जातीच्या रोपांची निर्मिती केली आहे. सदरील रोपांचे ग्रामस्थांना जून महिन्यात मोफत वाटप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गतवर्षी रमेश कनगरे यांनी आपल्या कुटुंबियांचा विरोध झुगारून निसर्गप्रेमापोटी ग्रामस्थांना विविध जातीच्या जवळपास ४५०० रोपांचे वाटप केले होते. गावातील पाण्याच्या टाकीखाली स्वखर्चातून ते रोपांची निर्मिती करतात. यावर्षी या त्यांच्या उपक्रमात त्यांची पत्नीही सहभागी झाली आहे. जेमतेम ५००० रुपये वेतन. त्यातूनच बचत करून त्यांनी पाण्याच्या टाकीखाली नर्सरी बनविली आहेत. या नर्सरीमध्ये सध्या अशोक २५०, काशिद ७००, सिसम ६००, सीताफळ ४००, बदाम ५००, जांभूळ मोठी २००, आंबा १००, लिंब ४००, चिंच २०० आदी जवळपास ३ हजार ५०० रोपे तयार केले असून, जून महिन्यात या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.
रमेश कनगरे हे ग्रा.पं.मध्ये कर्मचारी असून, त्यांची पत्नी विमलबाई या रोजंदारीवर काम करतात. परंतु निसर्गावर प्रेम असलेल्या या दाम्पत्यांनी मानधन तसेच रोजंदारीतून मिळणाऱ्या पैशातून काही पैसे बचत करून घरातच नर्सरी तयार केली आहे. रोपांची देखभाल करण्यासाठी तसेच शेड व इतर साहित्य आणि रोपे तयार केली. यासाठी लागलेला खर्च त्यांनीच केला. पाणी देण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Self-propagation of the plant!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.