प्रकाश वाघ यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:11 IST2021-02-05T04:11:03+5:302021-02-05T04:11:03+5:30
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील प्रकाश वाघ यांची पेन्शन संघटनेच्या जिल्हा प्रसिध्दी प्रमुखपदी निवड करण्यात आली. शहरातील धर्मवीर ...

प्रकाश वाघ यांची निवड
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील प्रकाश वाघ यांची पेन्शन संघटनेच्या जिल्हा प्रसिध्दी प्रमुखपदी निवड करण्यात आली. शहरातील धर्मवीर संभाजी शाळेत आयोजित २००५पूर्वीच्या पेन्शन संघटनेच्या मेळाव्यात ही निवड करण्यात आली.
फोटो क्रमांक- प्रकाश वाघ
--------------------------
कमळापुरात दारु पकडली
वाळूज महानगर : कमळापुरात अवैधरित्या देशी दारुची विक्री करणाऱ्या एकाला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मंगळवारी (दि. २६) छापा मारुन पकडले. त्याच्याकडून देशी दारुच्या २५ बाटल्या जप्त केल्या आहेत. कमळापूर परिसरात एकजण अवैधरित्या देशी दारुची विक्री करत असल्याची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत पथकाने अंबादास उर्फ बाळू मडीकर (रा. रांजणगाव) याला पकडून त्याच्याकडून १,३०० रुपये किमतीच्या २५ दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
------------------
जोगेश्वरीत सांडपाणी रस्त्यावर
वाळूज महानगर : जोगेश्वरीत ग्रामपंचायतीच्या पाठीमागील वसाहतीत सांडपाणी उघड्यावरुन वाहत आहे. या भागात बहुतांश गरीब कामगारांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करुन कच्ची-पक्की घरे बांधली आहेत. मात्र, सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाले नसल्याने सांडपाणी उघड्यावर साचते. नागरिकांना या घाण पाण्यातूनच ये-जा करावी लागत असून, दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
----------------------
तिरंगा चौकात वाहतूक कोंडी
वाळूज महानगर : पंढरपुरातील तिरंगा चौकात अतिक्रमणे व बेशिस्त वाहतुकीमुळे सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. या चौकात अॅपे रिक्षा चालक प्रवासी मिळविण्यासाठी रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. याठिकाणी फळविक्रेते व इतर छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करुन व्यवसाय थाटल्याने या चौकात सतत वाहतुकीची कोंडी होत आहे.
------------------------------
उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर
वाळूज महानगर : औरंगाबाद - नगर महामार्गावरील लिंक रोड चौफुलीवरील उड्डाणपुलाचे काम वेगात सुरु आहे. या चौफुलीवरुन सोलापूर - धुळे हा महामार्ग जात असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात पुलाचे काम करणारे परप्रांतीय कामगार मूळगावी गेल्याने या पुलाचे काम रखडले होते. आता पुलाचे काम वेगात सुरु असल्याने या चौकातील वाहतुकीची कोंडी सुटणार आहे.
-------------------