जलयुक्त शिवारसाठी १६० गावांची निवड

By Admin | Updated: February 27, 2016 00:27 IST2016-02-27T00:23:33+5:302016-02-27T00:27:36+5:30

परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरीता जिल्ह्यातील १६० गावांची निवड करण्यात आली

Selection of 160 villages for water tank | जलयुक्त शिवारसाठी १६० गावांची निवड

जलयुक्त शिवारसाठी १६० गावांची निवड

परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरीता जिल्ह्यातील १६० गावांची निवड करण्यात आली असून यासाठी राज्य शासनाकडे ३० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. या योजनेतील कामांच्या दृष्टीकोनातून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
राज्यात गतवर्षापासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत २०१५-१६ या पहिल्या वर्षात जिल्ह्यातील १७० गावांची निवड करण्यात आली होती. या अभियानांतर्गत कामे करण्यासाठी २५ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी जलयुक्त शिवारसाठी देण्यात आला होता. त्यापैकी डिसेंबर अखेरपर्यंत १८ कोटी ५५ लाख ३४ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. त्यामधील १७ कोटी ६३ लाख ३३ हजार रुपये या कामांवर खर्च करण्यात आले. खर्च करण्यात आलेल्या निधीमधून किती हेक्टर जमिनीचे क्षेत्र सिंचनाखाली आले, याची निश्चित आकडेवारी समोर आलेली नाही.
चालू वर्षी पुन्हा २०१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता जिल्ह्यातील १६० गावांची या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सेलू तालुक्यातील हिस्सी, मोरेगाव, खेर्डा, जवळा जिवाजी, शिंगठाणा, राव्हा, गिरगाव बु., सावंगी पिसी, डुगरा, गव्हा, गुगळी धामणगाव, कुंडी, डासाळा, प्रिंपुळा, लाडनांदरा, डिग्रस बु., शिंदे टाकळी, डिग्रस जहांगीर, राजवाडी, गुळखंड या २० गावांचा समावेश आहे. जिंतूर तालुक्यातील मांडवा, करवली, आडगाव बाजार, पाचेगाव, मोहखेडा, वस्सा, भोगाव, सांगळेवाडी, घेवडा, अंबरवाडी, मानकेश्वर, दहेगाव, बेलखेडा, कोरवाडी, बामणी, माथला, जांभरुन, गारखेडा, मोळा, मानमोडी, कौसडी, निवळी बु., निवळी खु., आसेगाव, देवगाव, कुऱ्हाडी, पिंपळगाव काजळे या २७ गावांचा समावेश आहे. पालम तालुक्यातील रावराजूर, खुर्लेवाडी, धनेवाडी, सावंगी भूजबळ, आरखेड, सायाळा, उमरथडी, खडी, महादेव वाडी, फळा, मोजमाबाद, नाव्हा, तांदूळवाडी या १३ गावांचा समावेश आहे. गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव, वाघदरी, डोंगरगाव, मालेगाव, दामपुरी, निळा नाईक तांडा, इरळद, इसाद, मसनेरवाडी, वाघलगाव, देवकतवाडी, खोकलेवाडी, ढवळकेवाडी, चिलगरवाडी, कोद्री, उंडेगाव, पांढरगाव, मसला, बडवनी, सुप्पा, पोखर्णी वाळके या २१ गावांचा समावेश आहे. मानवत तालुक्यातील पाळोदी, रामेटाकळी, मानोली, करंजी, भोसा, मंगरुळ पा.प., मांडेवडगाव, रत्नापूर, उक्कलगाव, हाटकरवाडी, रामपुरी, सारंगापूर या १२ गावांचा समावेश आहे. सोनपेठ तालुक्यातील खडका, शेळगाव म., कानेगाव, डिघोळ, निमगाव, आवलगाव, भिसेगाव, उक्कडगाव, बोंदरगाव, नैकोटा, कोरटेक या ११ गावांचा समावेश आहे. पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे, फुलकळस, दस्तापूर, वझूर, चुडावा, एरंडेश्वर, कात्नेश्वर, पेनूर, धानोरा काळे, लिमला, मजलापूर, आहेरवाडी, नावकी, सोन्ना, धानोरा मोत्या, सिरकळस, बलसा या १७, गावांचा समावेश आहे. परभणी तालुक्यातील गोविंदपूर, सारंगपूर, कुंभारी, कारला, डिग्रस, आर्वी, तुळजापूर, नांदापूर, मांडवा, इस्मालमपूर, शहापूर, नरसापूरतर्फे पेडगाव, जललापूर, टाकळी कुंभकर्ण, धर्मापुरी, कौडगाव, पारवा, रायपूर, पिंगळी, मिरखेल, नांदखेडा, बाभळी, ब्राह्मणगाव, कारेगाव, साडेगाव, पिंपरी देशमुख, सोन्ना या २७ गावांचा समावेश आहे. पाथरी तालुक्यातील हादगाव, बाबुलतार, रेणापूर, लोणी, टाकळगव्हाण, जैतापूरवाडी, पाथरगव्हाण बु., बाभळगाव, वाघाळा, फुलारवाडी, बोरगव्हाण, खेर्डा या १२ गावांचा समावेश आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १० गावांची घट झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Selection of 160 villages for water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.