‘इंद्रधनुष्य’ महोत्सवासाठी १00 कलावंतांची निवड
By Admin | Updated: September 19, 2014 01:02 IST2014-09-19T00:16:45+5:302014-09-19T01:02:11+5:30
औरंगाबाद : राज्यपाल कार्यालयाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १०० कलावंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

‘इंद्रधनुष्य’ महोत्सवासाठी १00 कलावंतांची निवड
औरंगाबाद : राज्यपाल कार्यालयाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १०० कलावंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या निवड चाचणीचे उद्घाटन सल्लागार समितीचे सदस्य प्रा. संभाजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. दिलीप बडे, विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालिका डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. संजय नवले, डॉ. जयंत शेवतेकर, परीक्षक राजेश्वर पंच, सतीश पाटील, चंद्रशेखर मलकमपट्टे, संतोष परचुरे आदींची उपस्थिती होती.
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २० महाविद्यालयांच्या कलावंत विद्यार्थ्यांनी निवड चाचणीमध्ये सहभाग घेतला होता. गुरुवारी सायंकाळपर्यंत ही निवड चाचणी घेण्यात आली. ५ कला प्रकारांसाठी ३५ कलावंतांचा एक संघ निवडला जाणार आहे.
राज्यपाल कार्यालयाच्या वतीने इंद्रधनुष्य या महोत्सवात राज्यभरातील विद्यापीठांचे संघ सहभागी होणार असून, हा महोत्सव ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठामध्ये होणार आहे. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव डिसेंबरमध्ये घेण्याचा निर्णय विद्यार्थी कल्याण विभागाने घेतला आहे. या महोत्सवासाठीही लवकरच कलावंत विद्यार्थ्यांच्या संघांची निवड केली जाणार आहे. निवड झाल्यानंतर त्या कलावंतांचा सराव तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सहकार्याने घेतला जाईल, असे डॉ. चेतना सोनकांबळे यांनी सांगितले.