इंदिरा आवास घरकुलाचे ४३४४ लाभार्थी निवडले
By Admin | Updated: August 7, 2014 23:37 IST2014-08-07T23:25:56+5:302014-08-07T23:37:05+5:30
जालना : इंदिरा आवास योजनेअंतर्गत सन २०१४-१५ या वर्षासाठी ४३४४ लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले आहे.

इंदिरा आवास घरकुलाचे ४३४४ लाभार्थी निवडले
जालना : इंदिरा आवास योजनेअंतर्गत सन २०१४-१५ या वर्षासाठी ४३९९ घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यापैकी ४३४४ लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले आहे. थेट लाभार्थ्यांना मंजुरीचे आदेश पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ही योजना राबविली जाते. अनुसुचित जातीच्या सुधारित प्रतीक्षा यादीतील ३०८३ तर सर्वसाधारण प्रवर्गातील १२६१ लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.
गेल्यावर्षीपासून इंदिरा आवास योजनेतंर्गत घरकुलाची किंमत एक लक्ष करण्यात आली असून यामध्ये केंद्र शासनाकडून ५२ हजार ५०० रूपये व राज्य शासनाकडून ४२ हजार ५०० अशी अनुदानाची रक्कम आहे. त्यात अनुदानापोटी ९५ हजार व लाभार्थी हिस्सा ५ हजार रूपये इतका आहे. या वर्षी लाभार्थ्यांना थेट पत्राद्वारे घरकुल मंजुरीचे आदेश पाठविण्यात येणार आहे. मंजूर लाभार्थ्यांसाठी रहिवाशी प्रमाण, नमुना क्र.८, दारिद्रय रेषे खाली असल्याबाबतचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, कुटूंब पत्रक, करारनामा, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रती, यापूर्वी घरकुलाचा लाभ न घेतल्या बाबतचा दाखला, इत्यादी कागदपत्रासहीत प्रस्ताव सादर करावे.