थकीत वसुलीसाठी जप्ती मोहीम

By Admin | Updated: August 13, 2014 00:22 IST2014-08-13T00:05:21+5:302014-08-13T00:22:35+5:30

परभणी:घरपट्टी व नळपट्टी थकबाकी वसुलीसाठी जप्ती मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आला़

Seizure campaign to recover the tired | थकीत वसुलीसाठी जप्ती मोहीम

थकीत वसुलीसाठी जप्ती मोहीम

परभणी:शहर मनपा प्रभाग समिती अ अंतर्गत घरपट्टी व नळपट्टी थकबाकी वसुलीसाठी जप्ती मोहीम राबविण्याचे आदेश मंगळवारी झालेल्या बैठकीत देण्यात आला़
मनपा उपायुक्त दीपक पुजारी, उपआयुक्त रणजीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती़ या बैठकीत प्रभाग समिती अ अंतर्गत कर्मचाऱ्यांनी घरोघरी जावून थकीत घर व नळपट्टी वसूल करण्याचे आदेश दिले़ अन्यथा पगार रोखण्यात येईल़
शहरातील नागरिकांनी अनेक वर्षापासून नळीपट्टी भरलेलीच नाही़ जे थकबाकीदार नळ व घरपट्टी भरणार नाहीत त्यांची मालमत्ता जप्त करावी असे आदेश देण्यात आले़ कर्मचाऱ्यांनी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत वसुली व जप्ती करावी, असे प्रभाग समिती प्रमुख सय्यद इम्रान यांनी आदेश दिले़
ज्या थकबाकीदारांकडे थकबाकी आहे़ त्यास दरमहा २ टक्के व्याज आहे़ त्यामुळे थकबाकीदारांना तत्काळ रक्कम भरावी, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Seizure campaign to recover the tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.