छोट्या टेम्पोतून आणलेली देशी दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:05 IST2021-04-22T04:05:31+5:302021-04-22T04:05:31+5:30
जायकवाडी परिसरातील राहुलनगर येथील दोघेजण अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथून देशी दारू आणून पैठण व शेवगाव तालुक्यातील सीमेवरील गावात अवैध ...

छोट्या टेम्पोतून आणलेली देशी दारू जप्त
जायकवाडी परिसरातील राहुलनगर येथील दोघेजण अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथून देशी दारू आणून पैठण व शेवगाव तालुक्यातील सीमेवरील गावात अवैध विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बुधवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, पोलीस नाईक कर्तार सिंगल, कॉ. समाधान भागिले, अरुण जाधव यांनी घारी शिवारात सापळा रचला. यावेळी आलेला एक छोटा टेम्पो पोलिसांनी पकडून तपासणी केली असता, यात देशी दारू आढळून आली. देशी दारूचे सात बॉक्स अंदाजे किंमत २१ हजार रुपये, गाडीची किंमत ३ लाख रुपये असा ३ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गणेश बाबूराव नाटकर (वय १९) व नितेश बडसल (३१, दोघेही रा. राहुलनगर, जायकवाडी) यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.