शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच वर्षांपूर्वी भूमिपूजन होऊनही रेल्वे स्टेशनचा दुसरा टप्पा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:04 IST

औरंगाबाद : माॅडेल रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील इमारतीचे साडेपाच वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. परंतु प्रत्यक्षात काम काही ...

औरंगाबाद : माॅडेल रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील इमारतीचे साडेपाच वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. परंतु प्रत्यक्षात काम काही झालेच नाही. त्यातच आता एकेरी रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाचे लवकरच रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. पण साडेपाच वर्षांपूर्वींचे काम अजूनही कागदावरच आहे, त्यामुळे हे नवे काम तरी प्रत्यक्षात कधी होईल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनचा माॅडेल रेल्वे स्टेशनमध्ये समावेश झाला आणि पहिल्या टप्प्यात सध्याची भव्य इमारत उभी राहिली. माॅडेल रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यात जुन्या इमारतीचा विकास केला जाणार आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ३ जुलै २०१५ रोजी दुसऱ्या टप्प्यातील जुन्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. परंतु साडेपाच वर्षांनंतरही हे काम सुरूच झालेले नाही.

रेल्वे स्टेशनचे काम पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने करून देश-विदेशातील पर्यटकांना नजरेसमोर ठेवून सुविधा दिल्या जातील, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे केवळ ‘बोलाचा भात’ ठरते आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर लवकर रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते एकेरी मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर सध्या विविध कामांचा धडाका सुरू आहे. जुन्या स्टेशनच्या इमारतीची रंगरंगोटी करून दुरवस्थेवर केवळ वरवर पांघरूण घालण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासंदर्भात सध्या काही माहिती देता येणार नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले.

केवळ आश्वासन; प्रत्यक्षात काही नाही

रेल्वेकडून केवळ आश्वासनं दिली जातात. हे सर्वेक्षण सुरू आहे, असे सांगितले जाते. भूमिपूजन केले जाते. प्रत्यक्षात काही होत नाही. छोट्या-छोट्या रेल्वे स्टेशनचा विकास केला. परंतु आपल्या स्टेशनचा विकास का करत नाही, असा प्रश्न आहे. लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे केवळ काहीतरी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो.

- खासदार इम्तियाज जलील

फाेटो ओळ...

रेल्वेमंत्र्यांच्या दौऱ्यांच्या तोंडावर रेल्वे स्टेशनच्या जुन्या इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे.