दुसºया दिवशीही ‘महसूल’चे परभणीत कामबंद सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:52 IST2017-09-14T00:52:37+5:302017-09-14T00:52:37+5:30
येथील तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि गंगाखेड येथील तलाठी शिवाजी मुरकुटे यांना पोलीस अधिकाºयांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ दुसºया दिवशीही महसूल कर्मचाºयांची कामबंद आंदोलन केले. त्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प पडले होते.

दुसºया दिवशीही ‘महसूल’चे परभणीत कामबंद सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि गंगाखेड येथील तलाठी शिवाजी मुरकुटे यांना पोलीस अधिकाºयांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ दुसºया दिवशीही महसूल कर्मचाºयांची कामबंद आंदोलन केले. त्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प पडले होते.
तहसीलदार कडवकर यांना अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी ८ सप्टेंबर रोजी अपमानास्पद वागणूक दिली होती. तर ९ सप्टेंबर रोजी गंगाखेडचे तलाठी शिवाजी मुरकुटे यांना पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार आहे. या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने मंगळवार पासून जिल्ह्यात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. दिवसभरात ठोस पावले उचलली नसल्याने बुधवारी संपूर्ण मराठवाड्यात हे आंदोलन सुरू करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाºयांनी बुधवारीही आंदोलन केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयासह तालुक्याच्या ठिकाणचे महसूलचे कामकाज ठप्प पडल्याचे पहावयास मिळाले.