दुसऱ्या दिवशीही तीव्र पडसाद

By Admin | Updated: January 7, 2015 01:02 IST2015-01-07T00:46:21+5:302015-01-07T01:02:29+5:30

परळी : विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ मंगळवारी दुसऱ्या दिवशीही परळीसह संपूर्ण जिल्हाभर आंदोलने झाली़ मुंडे यांच्यावरील हल्ल्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी

The second day, severe depression | दुसऱ्या दिवशीही तीव्र पडसाद

दुसऱ्या दिवशीही तीव्र पडसाद


परळी : विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ मंगळवारी दुसऱ्या दिवशीही परळीसह संपूर्ण जिल्हाभर आंदोलने झाली़ मुंडे यांच्यावरील हल्ल्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली़
भगवानगडावर दर्शनासाठी गेलेल्या धनंजय मुंडे यांच्या गाडीवर सोमवारी दगडफेक झाली होती़ त्याचे तीव्र पडसाद उमटले होते़ मंगळवारी देखील परळीमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, दीपक देशमुख, चंदुलाल बियाणी, रवी मुळे, राजेंद्र सोनी आदी सहभागी झाले होते़
दरम्यान, घाटनांदूर, सिरसाळा येथेही आंदोलन झाले़ दगडफेकीला फूस देणाऱ्या व दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली़
पाटोद्यात बंद
येथे कडकडीत बंद पाळण्यात आला़ सभापती महेंद्र गर्जे, जब्बार पठाण, बन्सी खाडे, कुंडलिक बावणे, हरिदास सानप, गणेश सानप यांनी बंदचे आवाहन केले़ (वार्ताहर)४
श्री क्षेत्र भगवानगड हे धार्मिक स्थळ आहे़ या गडावरून राजकारण होणे दुर्दैवी असल्याचे समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे यांनी पाटोदा येथे मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले़ विरोधी पक्ष नेतेपद हे संवैधानिक पद आहे़ या पदावरील नेत्याबद्दल एकेरी भाषेत बोलणे योग्य नाही़ दगडफेक होत असताना धनंजय मुंडे यांच्याबद्दल चिथावणी देणारे वाक्य उद्गारले गेल्याचे गौप्यस्फोटही त्यांनी केला़ तेथे घडलेल्या बारीकसारीक बाबींची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली़

Web Title: The second day, severe depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.