बियाणाचा भाव ७ हजार, भुईमूग साडेतीन हजार
By Admin | Updated: June 2, 2014 01:04 IST2014-06-02T00:58:31+5:302014-06-02T01:04:19+5:30
कंधार : मागील वर्षी भुईमूग शेंगा बियाणासाठी ७ हजार रुपये क्विंटल प्रमाणे शेतकर्यांनी खरेदी केली़ नियोजन पूर्वक उन्हाळी भुईमूग लागवड केली़

बियाणाचा भाव ७ हजार, भुईमूग साडेतीन हजार
कंधार : मागील वर्षी भुईमूग शेंगा बियाणासाठी ७ हजार रुपये क्विंटल प्रमाणे शेतकर्यांनी खरेदी केली़ नियोजन पूर्वक उन्हाळी भुईमूग लागवड केली़ आता ३ हजार ५०० च्या आसपास भाव मिळत आहे़ खर्चही निघत नसल्याने शेतीची नवी कथा आकाराला येत आहे़ कथेतून शेतकरी व्यथीत होत असल्याचे चित्र आहे़ शेतकरी शेती फुलवण्यासाठी नानाविध उपाय करत असतो़ हिरव्या शेतीतून आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो़ परंतु मनाजोगते काहीही होत नसते़ तरीही निराश होत नाही, आत्मविवास ढळू देत नाही़ नव्या उमेदीने शेतीत नवीन प्रयोग शेतकरी करत असतो़ अशाच पद्धतीने यावर्षीचे नियोजन शेतकर्यांनी मागील वर्षी केले़ परंतु पदरी निराशा पडल्याचे समोर आले़ मागील वर्षी बियाणासाठी शेतकर्यांनी भुईमूग शेंगा ७ हजार रु. क्विंटलप्रमाणे खरेदी केली़ पेरणीपूर्व मशागत, लागवड, खत आदीने उन्हाळी भुईमूग लागवड करण्यात आली़ काढण्यापूर्वीच अवकाळी पावसाची हजेरी लागली़ काढताना शेतमजुरांना विणवणी करावी लागली़ एकरी ७-८ क्विंटल उतारा येईल, ही अपेक्षा फोल ठरली़ ५-६ क्विंटल प्रतिएकरचा उतारा आला आणि भाव मात्र ३ हजार ५०० असा मिळाला़ त्यामुळे खर्च अधिक व उत्पन्न कमी असा अनुभव शेतकर्यांना घ्यावा लागला़ (वार्ताहर)