नेपाळला गेलेल्या पर्यटकांचा शोध सुरू
By Admin | Updated: April 27, 2015 00:54 IST2015-04-27T00:40:47+5:302015-04-27T00:54:39+5:30
जालना : नेपाळ व उत्तर भारतात आलेल्या भूकंपासंदर्भात जालना जिल्ह्यातून पर्यटन किंवा इतर कारणांसाठी नेपाळ किंवा उत्तर भारतात गेलेल्या नागरिकांचा जिल्हा प्रशासनाकडून शोध सुरू आहे

नेपाळला गेलेल्या पर्यटकांचा शोध सुरू
जालना : नेपाळ व उत्तर भारतात आलेल्या भूकंपासंदर्भात जालना जिल्ह्यातून पर्यटन किंवा इतर कारणांसाठी नेपाळ किंवा उत्तर भारतात गेलेल्या नागरिकांचा जिल्हा प्रशासनाकडून शोध सुरू आहे. यासंबंधी काही यात्रा कंपन्या, ट्रॅव्हल्सधारक एजन्सींशीही संपर्क साधल्याची माहिती सुत्रांनी दिली.
गेल्या दोन दिवसांमध्ये अद्याप कोणी नेपाळ किंवा उत्तर भारतात गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झालेली नाही.
मात्र याबाबत बेपत्ता किंवा संपर्क होत नसलेल्या नागरिकांची माहिती संपूर्ण नाव, फोटो, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक व शेवटचा संपर्क कधी व कोठे झाला याविषयीची माहिती द्यावी.
तसेच माहिती देणाऱ्या व्यक्तीचा तपशील व बेपत्ता व्यक्तीशी नाते इत्यादी माहिती योग्य त्या पुराव्यासह जिल्हा प्रशासनाला जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय जालना दुरध्वनी क्रमांक ०२४८२-२२३१३२ किंवा दीपक काजळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संपर्क ९४०३७६२००५, ८८५५९२१७९८ या क्रमांकावर द्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)