व्यापारी संकुलातील २२ गाळ्यांना सील
By Admin | Updated: August 20, 2014 00:22 IST2014-08-19T23:59:08+5:302014-08-20T00:22:38+5:30
वसमत : येथील नगर परिषदेच्या डॉ.जयप्रकाश मुंदडा व्यापारी संकुलातील २२ दुकानांना पालिकेच्या वसुली विभागाने १९ आॅगस्ट रोजी सील लावले.

व्यापारी संकुलातील २२ गाळ्यांना सील
वसमत : येथील नगर परिषदेच्या डॉ.जयप्रकाश मुंदडा व्यापारी संकुलातील २२ दुकानांना पालिकेच्या वसुली विभागाने १९ आॅगस्ट रोजी सील लावले. थकीत भाडे वसूल करण्यासाठी पालिकेने ही कारवाई केली आहे.
या व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडे ११ लाख ९९ हजार २८७ रुपयांऐवजी जुनी थकबाकी आहे. वसमत न.प.च्या खालच्या भागात डॉ. जयप्रकाश मुंदडा व्यापारी संकुल आहे. न.प.च्या जवळील व्यापाऱ्यांकडे थकबाकी मोठ्या प्रमाणात असला तरी आजवर पालिकेने वसुलीसाठी धडक कारवाई केली नव्हती. मंगळवारी सकाळीच न.प.चे पथक वसुलीसाठी खाली आले व त्यांनी थकबाकी असलेल्या गाळ्यांना कुलूप लावण्याचा सपाटा लावला. या कारवाईमध्ये एकूण २४ गाळ्यांना टाळे ठोकण्यात आले. त्यातील दोघांनी थकबाकी भरल्यानंतर सील उघडण्यात आले. तर उर्वरित २२ गाळ्यांना न.प.ने सील लावण्याची कारवाई केली. (वार्ताहर)