गुढ आवाजाने परंडा हादरले
By Admin | Updated: January 8, 2015 00:57 IST2015-01-08T00:50:43+5:302015-01-08T00:57:30+5:30
परंडा : मंगळवारी सकाळी १०.५५ वाजेच्या सुमारास परंडा शहर व परिसर गुढ आवाजाने हादरला. त्यामुळे काहीकाळ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले हाते

गुढ आवाजाने परंडा हादरले
परंडा : मंगळवारी सकाळी १०.५५ वाजेच्या सुमारास परंडा शहर व परिसर गुढ आवाजाने हादरला. त्यामुळे काहीकाळ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले हाते. मागील दोन वर्षामध्ये अनेकवेळा असे गुढ आवाज झाले आहेत. याचीच प्रचिती मंगळवारी सकाळी १०.५५ वाजेच्या सुमारास परंडेकरांना आली. अचानक झालेल्या या गुढ आवाजामुळे घरातील भांडी खाली पडली. तसेच पत्रेही हादरले. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे विचारणा केली असता, कुठेही अप्रिय घटना घडली नसल्याचे सांगितले. (वार्ताहर)४
आवाजाचे गुढ जाणून घेण्यासाठी पुणे येथील भू-वैज्ञानिकांचे पथक २०१४ मध्ये परंडा येथे आले होते. या पथकाने तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांनी पथकाकडे विचारना केली असता अहवाल आल्यानंतर कारण समोर येईल, असे सांगितले होते. परंतु, वर्ष सरले तरीही अहवाल आला नसल्याने आज तरी आवाजाचे गुढ कायम आहे.