देशभरातील शास्त्रज्ञ परभणीत
By Admin | Updated: December 17, 2015 23:59 IST2015-12-17T23:51:25+5:302015-12-17T23:59:34+5:30
परभणी : येथील कृषी विद्यापीठामध्ये शुक्रवारपासून होणाऱ्या अखिल भारतीय स्तरावरील अन्न शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांची १४ व्या परिषदेत देशभरातून अन्नशास्त्रज्ञ उपस्थित राहणार

देशभरातील शास्त्रज्ञ परभणीत
परभणी : येथील कृषी विद्यापीठामध्ये शुक्रवारपासून होणाऱ्या अखिल भारतीय स्तरावरील अन्न शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांची १४ व्या परिषदेत देशभरातून अन्नशास्त्रज्ञ उपस्थित राहणार असून विद्यापीठातील सभागृहामध्ये ३५ अन्नशास्त्रज्ञांचे मार्गदर्शन या दोन दिवसात होणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अन्न तंत्र महाविद्यालय आणि म्हैसूर येथील अ़भा़ अन्न शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ मंडळाच्या वतीने ही परिषद घेतली जात आहे़
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात अन्नशास्त्रज्ञांची ही परिषद होत आहे. दोन दिवसांच्या या परिषदेमुळे अन्न प्रक्रिया उद्योग, त्याचे तंत्रज्ञान आणि कृषी मालाविषयीच्या विविध शास्त्रीय बाबींची माहिती मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर ठेवली जाणार आहे.
परिषदेच्या निमित्ताने गुरुवारीच अन्न शास्त्रज्ञ संघटनेचे पदाधिकारी परभणीत दाखल झाले. मुख्य समारंभ आणि अन्य बाबींविषयीचा आढावा त्यांनी घेतला. विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये देशातील विविध भागातील ३५ अन्न शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. त्याच प्रमाणे १५३ अन्न शास्त्रज्ञांचे संशोधनात्मक भित्तीपत्रके प्रकाशित केली जाणार आहेत. या भित्तीपत्रकांना पुरस्कारही दिले जाणार आहेत. अन्न परिषदेच्या निमित्ताने प्रदर्शनीचे आयोजन केले असून देशातील नामवंत उद्योजकांचे ८० स्टॉल्स या प्रदर्शनात लावले जाणार आहेत. या परिषदेत किमान १५ ते २० हजार शेतकरी उपस्थित राहतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.