शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

शाळाच पाळेना नियम, RTE च्या मुलांना प्रवेश नाकारला; मुख्याध्यापिकेसह व्यवस्थापनावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 19:21 IST

छत्रपती संभाजीनगरातील ‘एसबीओए’ शाळेतील प्रकार; शालेय शिक्षण विभागाची कडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार (आरटीई) आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के राखीव जागांवरील अलॉटमेंट झालेल्या ६७ मुलांना एसबीओए शाळेने प्रवेशापासून वंचित ठेवले. मुख्याध्यापिकेसह इतरांना शालेय शिक्षण विभागाने नोटिसीसह तोंडी आदेश दिले, तरीही शाळेने जुमानले नाही. शेवटी शिक्षण विभागाने मुख्याध्यापिकेसह शाळा व्यवस्थापनाविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

आरोपींमध्ये एसबीओए शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता शित्रे यांच्यासह व्यवस्थापनावरील सदस्यांचा समावेश आहे. शालेय शिक्षण विभागाचे कार्यालयीन अधीक्षक सचिन शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरटीई पोर्टल अंतर्गत २४ जुलै ते २९ ऑगस्टदरम्यान ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार प्रत्येक शाळेने प्रवेश देण्यास सुरुवात केली होती. मात्र, २६ ऑगस्ट रोजी बालाजी भोसले यांच्यासह इतर २९ पालकांनी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांची भेट घेत ६७ मुलांचे प्रवेश एसबीओए शाळेत निश्चित झाले, आम्ही प्रत्यक्ष शाळेत प्रवेशासाठी गेल्यानंतर मुलांना प्रवेश नाकारल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानुसार शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी मुख्याध्यापिका सुनीता शित्रे यांना कार्यालयात बोलावून घेतले.

मात्र, त्यांनी माध्यमिकच्या मुख्याध्यापिका शुभदा पुरंदरे यांना पाठवले. पुरंदरे यांनी एसबीओए शाळेने आरटीई प्रवेशाबाबत प्रतिपूर्ती मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली असून, २ सप्टेंबर रोजी सुनावणी आहे. न्यायालयातील सुनावणीनंतर शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे तोंडी सांगितले. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे लेखी आदेश दिले. त्यानंतरही शाळेने उच्च न्यायालयात याचिकेचा संदर्भ देत मुलांना शाळेत प्रवेश दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे काय होणार?एसबीओए शाळेने ६७ मुलांना प्रवेश देण्यास नकार दिला. शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांसह इतरांवर गुन्हे नोंदविले आहेत. मात्र, त्यानंतरही ६७ मुलांच्या प्रवेशाचे काय होणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. शाळा सुरू होऊन तीन महिने उलटले आहेत, तरीही मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश झालेला नाही. या मुलांचे शैक्षणिक नुकसान कसे भरून काढणार, असा सवालही मुलांच्या पालकांनी उपस्थित केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाCrime Newsगुन्हेगारी