शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha Protest : मराठवाड्यात शाळा अन् कॉलेज बंद, बससेवाही ठप्पच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 09:37 IST

मराठा क्रांती मोर्चाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.  गोदावरी नदीत काकासाहेब शिंदे या तरुणाने उडी घेऊन आपला जीव दिला. त्यानंतर,

औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.  गोदावरी नदीत काकासाहेब शिंदे या तरुणाने उडी घेऊन आपला जीव दिला. त्यानंतर, राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे-औरंगाबाद महामार्गावर कुठल्याही बसेस सुरु न ठेवण्याचा निर्णय एसटी आगाराकडून घेण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात बससेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मराठा आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर मराठवाड्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. प्रामुख्याने मराठवाड्यात आज कडेकोट बंद पाळण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील आठही प्रमुख जिल्ह्यात बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे. तसेच औरंबागाबादमधील शाळा आणि महाविद्यालयेही बंद राहणार आहेत. मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मराठा आंदोलक त्यांच्या मूळगावी मोठ्या संख्येने हजर राहणार असल्याचे समजते. याप्रकरणी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदmarathaमराठाMarathwadaमराठवाडा