जलपुनर्भरणातून शाळेने जगवली फळझाडे
By Admin | Updated: April 23, 2016 23:57 IST2016-04-23T23:30:22+5:302016-04-23T23:57:54+5:30
बीड : तालुक्यातील नवगण राजुरी जि. प. शाळेने जलपुनर्भरणातून दुष्काळावर मात करीत शाळा परिसरातील झाडे जगवून इतर शाळांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

जलपुनर्भरणातून शाळेने जगवली फळझाडे
बीड : तालुक्यातील नवगण राजुरी जि. प. शाळेने जलपुनर्भरणातून दुष्काळावर मात करीत शाळा परिसरातील झाडे जगवून इतर शाळांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
२०१२ मध्ये जि. प. सभापती संदीप क्षीरसागर यांनी मानवलोकच्या सहाय्याने जलपुनर्भरण प्रकल्प शाळेत उभारला. त्यासाठी दीड लाख रूपये खर्च आला. तो क्षीरसागर यांनी स्वत: उचलला. इमारतीसह शाळेचा परिसर दोन एकर असून, छतावर पडणारे पाणी पाईपलाईनद्वारे बोअरमध्ये सोडले आहे. शाळेत ५०० वर विद्यार्थी आहेत. त्या सर्वांसाठी लागणारा भाजीपाला परसबागेत पिकवला जातो. १३८ रोपांची लागवड केली असून, यात विविध मोसमातील फळझाडांचा समावेश आहे. या फळझाडांना विद्यार्थ्यांची नावे दिली असून, दुष्काळातही झाडांची जोपासना केली आहे. गावातील इतर बोअर आटलेले असताना शाळेचा बोअर मात्र सुरू आहे. त्यावर झाडे, परसबाग, सुशोभिकरण व फुलपाखरू उद्यान टिकून आहे. साने गुरूजी स्वच्छता योजनेत शाळेने नुकताच जिल्ह्यातून अव्वल क्रमांक मिळवला. शाळेने गावकरी व शिक्षक एकत्र आल्याने ही किमया झाली. (प्रतिनिधी)