‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर’ औरंगाबादलाच; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 13:07 IST2017-12-23T13:06:40+5:302017-12-23T13:07:28+5:30
‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर’ ही संस्था औरंगाबादलाच होणार असून, ही शिखर संस्था पुणे किंवा इतर मोठ्या शहरात हलविण्याबाबत केंद्रासोबत कसलाही पत्र व्यवहार झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 'लोकमत' ला बोलताना दिली.

‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर’ औरंगाबादलाच; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
औरंगाबाद : ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर’ ही संस्था औरंगाबादलाच होणार असून, ही शिखर संस्था पुणे किंवा इतर मोठ्या शहरात हलविण्याबाबत केंद्रासोबत कसलाही पत्र व्यवहार झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 'लोकमत' ला बोलताना दिली.
‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर’ ही संस्था पुण्याला होणार असल्याच्या बातम्या शनिवारी प्रसिद्ध झाल्या आहेत. या प्राश्वभूमिवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना नमूद केले कि, एसपीए ही संस्था औरंगाबादला स्थापन व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.