बनकिन्होळा ग्रामपंचायत कार्यालयात भरली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:08 IST2017-08-13T00:08:06+5:302017-08-13T00:08:06+5:30
शालेय व्यवस्थापन समितीने शनिवारी (दि.१२) चक्क ग्रामपंचायत कार्यालयात शाळा भरवून आपला रोष व्यक्त केला.

बनकिन्होळा ग्रामपंचायत कार्यालयात भरली शाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
बनकिन्होळा : निल्लोड कें द्रांतर्गत येणाºया बनकिन्होळा येथील जि.प. शाळेच्या दुरुस्तीसाठी तब्बल दीड वर्षापासून निधी मंजूर आहे. मात्र, तरीही ग्रा.पं. प्रशासन शाळेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ शालेय व्यवस्थापन समितीने शनिवारी (दि.१२) चक्क ग्रामपंचायत कार्यालयात शाळा भरवून आपला रोष व्यक्त केला. शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असून, वरिष्ठांनी दखल घेऊन त्वरित शाळा दुरुस्तीचे आदेश द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
येथील जि.प. शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. शाळेची इमारत जुनी झाल्याने इमारतीस अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. बºयाच ठिकाणी शाळेतील फरशी निखळल्या आहेत. तसेच पत्रे जीर्ण झाल्याने त्यांना छिद्रे पडली आहेत. यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी वर्गात साचते. याच परिस्थितीत विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून ज्ञानार्जन करावे लागत आहे.
विशेष म्हणजे शालेय व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी इमारत दुरुस्तीसाठी दोन वर्षांपूर्वी जि.प. शिक्षण व बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.
यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने या शाळेच्या दुुरुस्तीसाठी २ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. यानंतर शालेय व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी अनेक वेळा ग्रा.पं. कार्यालयाकडे शाळा दुरुस्तीची मागणी केली. मात्र, तरीही शाळेच्या इमारत दुरुस्तीकडे दुर्लक्ष
करण्यात आले.
शाळेची इमारत मोडकळीस आली असली तरी विद्यार्थी जीव धोक्यात घालून ज्ञानार्जन करीत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांसह शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाºयांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालयात शाळा भरवून आपला रोष व्यक्त केला. तसेच त्वरित शाळेच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश काकडे, सदस्य एकनाथ फरकाडे, गजानन जैस्वाल, सीताराम फरकाडे, सुभाष नवतुरे, राजू फरकाडे, लक्ष्मण शिंदे, तुकाराम फरकाडे, शब्बीर शहा, संजय फरकाडे, शाईनाथ दामले, ज्ञानेश्वर फरकाडे, विष्णू फरकाडे, संदीप फरकाडे, कारभारी फरकाडे, मुख्याध्यापक रामदास जाधव आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.