शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेंद्रा एमआयडीसीत स्कूलबसने दुचाकीला उडवले, एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 14:03 IST

अपघातात मृत आणि एक जखमी परराज्यातील असल्याची माहिती आहे

करमाड ( औरंगाबाद) : शेंद्रा एमआयडीसीतील डी-सेक्टरमध्ये वोखार्ड शाळेसमोर रिकाम्या स्कूलबसने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला उडवले. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अजितकुमार उत्तमकुमार रुद्रपाल ( २०, काचर,आसाम, ह.मू. कुंबेफळ ता. औरंगाबाद ) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात आज सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास झाला.

आज सकाळी शेंद्रा एमआयडीसीमध्ये अजितकुमार उत्तमकुमार रुद्रपाल आणि इतर दोघे एका बाईकवर  (MH 20 FF 03640) प्रवास करत होते. डी-सेक्टरमध्ये वोखार्ड शाळेसमोर रस्ता ओलांडताना एका स्कूलबसने (MH 20 EG 7285 ) बाईकला जोरदार धडक दिली. यात अजितकुमार रुद्रपाल या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. 

गंभीर जखमींमध्ये औरंगाबाद तालुक्यातील लाडगाव येथील रहिवासी आकाश अनिल साळवे ( 25) आणि परराज्यातील एकाचा समावेश आहे. परराज्यातील तरुणाच्या दोन्ही पायांना जबर मार लागल्याची माहिती आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार जगताप, पोकॉ. दादा पवार यांनी अपघातस्थळी धाव घेतली. सर्व जखमींना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू