शालेय पुस्तके हातात

By Admin | Updated: June 7, 2014 00:26 IST2014-06-06T23:34:47+5:302014-06-07T00:26:04+5:30

मुखेड : उन्हाळी सुट्या संपत आल्या असून शाळा सुरू होण्याची तारीख जवळ येत आहे.

School books are in hand | शालेय पुस्तके हातात

शालेय पुस्तके हातात

मुखेड : उन्हाळी सुट्या संपत आल्या असून शाळा सुरू होण्याची तारीख जवळ येत आहे. शिक्षण खात्याने शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेला लागणारे शालेय साहित्य प्रत्येक तालुक्याच्या शिक्षण विभागाकडे सोपविले आहे. सर्व शिक्षा अभियाना- अंतर्गत विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके सर्व शाळांना पुरविण्यात आली. गणवेश व पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी वाटप करण्यात येणार असून याची तयारी श्क्षिण विभागाने पूर्ण केली आहे.
मराठवाड्यातील शाळा १६ जून पासून सुरू होणार आहेत. मुला-मुलींच्या शाळा प्रवेशाची जोरदार तयारी सुरू आहे. जून महिन्यात प्रवेश पंधरवडा अभियान राबविण्यात येणार असून नव्यानेच पहिलीत व बालवाडीत प्रवेश घेणाऱ्या लहान मुलांना पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात येणार आहे. त्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दिवशी पाठ्यपुस्तके मोफत वाटप करण्यात येणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी १५ जूनला सर्व क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांची बैठक घेवून शाळा स्वच्छतेची पाहणी करण्यात येणार असून गावा-गावात ध्वनिक्षेपकाद्वारे शाळा सुरू होत असल्याची घोषणा करण्यात येणार आहे. याच दिवशी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादीचे वाचन होणार असून गावातील शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सरपंच, पोलिस पाटील, ज्येष्ठ नागरिक व बचत गटांना सोबत घेवून घरोघरी भेटी देण्यात येणार आहेत. प्रवेशपात्र मुलांचे प्रवेश करुन घेण्यात येणार आहे. १६ जून रोजी प्रवेश घेणाऱ्या व पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळा सजवून तसेच पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार आहेत.
१६ जून रोजी शंभर टक्के उपस्थिती दाखवून वर्ग अध्यापनास सुरुवात करण्यात येणार आहे. तालुक्यातील ४५ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्याचा मानस श्क्षिण विभागाचा आहेत. यात मराठी, उर्दू सेमी इंग्रजीचे पाठ्य पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. यासोबतच जि. प. च्या शाळेत शिकणाऱ्या सर्व मुलींना व अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्य रेषेखालील मुलांना अशा २१ हजार ८४४ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जाणार आहेत. मुखेड तालुक्यातील जि. प. प्राथमिक २३२ शाळा असून माध्यमिक शाळा सहा आहेत. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत पहिलीच्या ६ हजार ३०३ मुला-मुलींना पाठ्यपुस्तके मोफत वाटप करण्यात येणार असून इयत्ता दुसरीच्या ५ हजार ३३६, ६ वी ४ हजार ९८२, ७वी ३ हजार ९२६ असे एकूण ४२ हजार ९३२ विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात असून शिक्षण विभागाने तशी तयारी केल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष शेटकार यांनी सांगितली. (वार्ताहर)
जून महिन्यात प्रवेश पंधरवडा अभियान राबविण्यात येणार असून नव्यानेच पहिलीत व बालवाडीत प्रवेश घेणाऱ्या लहान मुलांना पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात येणार असून त्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दिवशी पाठ्यपुस्तके मोफत वाटप करण्यात येणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी १५ जूनला सर्व क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांची बैठक घेवून शाळा स्वच्छतेची पाहणी करण्यात येणार असून गावा-गावात ध्वनिक्षेपकाद्वारे शाळा सुरू होत असल्याची घोषणा करण्यात येणार आहे.

Web Title: School books are in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.