सव्वाचार लाखांची शिष्यवृत्ती वाटप
By Admin | Updated: May 22, 2014 00:32 IST2014-05-22T00:23:52+5:302014-05-22T00:32:37+5:30
परभणी : येथील जिल्हा परिषद समाजकल्याण अपंग विभागाच्या वतीने शालांतपूर्व शिष्यवृत्ती

सव्वाचार लाखांची शिष्यवृत्ती वाटप
परभणी : येथील जिल्हा परिषद समाजकल्याण अपंग विभागाच्या वतीने शालांतपूर्व शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५७३ अपंग विद्यार्थ्यांना ४ लाख ३० हजार १०० रुपयांची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली आहे. शासनाच्या वतीने समाजातील कोणत्याही घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे गोरगरिब व अपंगांनाही शिक्षण घेता येऊ लागले आहे. जिल्हा परिषद समाजकल्याण अपंग विभागांतर्गत शालांतपूर्व शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पहिली ते चौथी वर्गातील अपंग विद्यार्थ्यांना वार्षिक ५०० रुपये शिष्यवृत्ती पाचवी ते सातवीतील अपंग विद्यार्थ्यांना वार्षिक ७५० रुपये शिष्यवृत्ती, आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना वार्षिक १००० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीधारक अपंग विद्यार्थ्यांची तालुका निहाय संख्या परभणी- १८७ , जिंतूर- ५२, सेलू ६७, मानवत- ७३, पाथरी- ९०, सोनपेठ- ०६, गंगाखेड- २३, पालम- १४, पूर्णा तालुक्यातील ३२ अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद समाजकल्याण अपंग विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)