प्रकल्प भरूनही टंचाईकायम..!
By Admin | Updated: October 13, 2016 00:09 IST2016-10-13T00:08:48+5:302016-10-13T00:09:45+5:30
उस्मानाबाद : अनेक गावांमध्ये प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजना अर्धवट अवस्थेत असून, काही ठिकाणच्या योजना दुरुस्तीअभावी बंद आहेत.

प्रकल्प भरूनही टंचाईकायम..!
उस्मानाबाद : मागील महिन्यात जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जवळपाच सर्वच जलसाठे तुडूंब भरले. त्यामुळे मागील चार वर्षांपासून तीव्र दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्हावासियांत आनंदाचे वातावरण आहे. जलसाठा वाढल्यामुळे पाणीप्रश्न मार्गी लागण्याबरोबरच शेतीलाही चांगला फायदा होणार आहे. असे असले तरी अनेक गावांमध्ये प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजना अर्धवट अवस्थेत असून, काही ठिकाणच्या योजना दुरुस्तीअभावी बंद आहेत. काही गावांमध्ये तर अद्याप योजनाच राबविलेली नाही. त्यामुळे मुबलक पाणीसाठा झाला असला तरी ग्रामस्थांना योजनेअभावी पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देवून तातडीने सर्व योजना मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.