शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये रिपाइं ‘सायलेंट’ !

By admin | Updated: October 8, 2014 00:52 IST

बीड : युती, आघाडीच्या फाटाफुटीनंतर रिपाइंने भाजपाच्याच बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला़ मात्र बीडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रिपाइंचे कार्यकर्ते

बीड : युती, आघाडीच्या फाटाफुटीनंतर रिपाइंने भाजपाच्याच बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला़ मात्र बीडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रिपाइंचे कार्यकर्ते कुठेच दिसत नाहीत़ भाजपचे उमेदवार विनायक मेटे यांच्या प्रचारापासून रिपाइंचे नेते, कार्यकर्ते चार हात दूरच आहेत़रिपाइं नेते रामदास आठवले यांचे विश्वासू सहकारी व युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती़ मात्र तेथे भाजपने प्रा़ संगीता ठोंबरे यांना संधी दिली़ त्यामुळे कागदे समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे़ आठवले यांच्यासोबत सावलीप्रमाणे वावरणारे कागदे हे दलित चळवळीतील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत़ रिपाइंच्या माध्यमातून त्यांनी जिल्हाभर कार्यकर्त्यांचे जाळे उभे केलेले आहे़ मात्र भाजपासोबत युती करूनही रिपाइंचे कार्यकर्ते प्रचारात कोठेही जाहीरपणे दिसत नाहीत़ बीडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली़ तेथेही रिपाइं कार्यकर्ते पहायला मिळाले नाहीत़ याबाबत रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्याशी संपर्क केला असता ते ‘आऊट आॅफ कव्हरेज’ होते़समजूत काढूभाजपचे जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड़ सर्जेराव तांदळे म्हणाले, रिपाइं आमचा मित्र पक्ष आहे़ त्यांची नाराजी असू शकते मात्र ते आमच्या कुटुंबातीलच असल्याचे आम्ही मानतो़ त्यांची समजूत काढून प्रचारात सक्रीय करू, असेही तांदळे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यापासून भाजप उमेदवार विनायक मेटे वेगळ्याच तोऱ्यात आहेत़ राष्ट्रवादीचे चार पदाधिकारी फोडून त्यांनी इनकमिंग सुरू तर केले पण मित्रपक्षाची नाराजी दूर करण्यात त्यांना अपयश आले़ त्यामुळे राष्ट्रवादीला हादरे देण्याच्या नादात मेटेंना मित्रपक्षाचाच विसर पडल्याचे दिसून येते़ रिपाइं पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने नाराजी वाढल्याचा सूर आहे़ गाडीला मित्रपक्षाचे झेंडे लावून मेटे फिरत आहेत मात्र स्वाभिमानी शेतकरी आघाडीचा केवळ दांडाच लावण्यात आलेला आहे़ या दांड्यासाठी झेंडाच सापडत नाही, अशी सूत्रांची माहिती आहे़