शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

'एकदा ‘सॉरी’ म्हण, सगळे विसरून जातो'; तिने नकार देताच झाले औरंगाबादमधील जळीतकांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 13:28 IST

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांच्या वादात एका प्राध्यापकाने मध्यस्थी करीत दोघांचे १२ नोव्हेंबर रोजी समुपदेशन केले. तरुणाने तरुणीला यापुढे त्रास देणार नाही, असा शब्द दिला. मात्र, त्यासाठी एकदा माझी फसवणूक केल्याबद्दल ‘सॉरी’ म्हणावे अशी अट घातली. त्यावर तरुणीने आपण कोणाचीही फसवणूक केलेली नसल्यामुळे ‘सॉरी’ म्हणण्यास नकार दिला. वाद विकोपाला गेल्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी एका तात्कालिक कारणामुळे त्याचे पर्यवसान जळीतकांडात झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी गजानन मुंडे याने जाळून घेत सहकारी संशोधक विद्यार्थिनीला कवटाळल्याचा प्रकार २१ नोव्हेंबर रोजी घडला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. बुधवारी तपास पथकाने पीडित तरुणीकडील पेन ड्राइव्ह, व्हॉट्सॲप चॅट जप्त केले. त्याशिवाय विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागप्रमुख, दोघांच्या पीएच.डी.चे मार्गदर्शक, विज्ञान संस्थेतील प्राध्यापक, तरुणासह तरुणीचे मित्र-मैत्रीण यांचे जबाब नोंदवले. त्यातील एका प्राध्यापकाच्या जबाबानुसार मृत तरुणाने त्यांच्याकडे पीडित तरुणीने फसवणूक केल्याविषयी तक्रार केली होती. प्राध्यापकाने दोघांना १२ नोव्हेंबर रोजी समोरासमोर बसवून समुपदेशन केले. तरुणाने एकदा ‘सॉरी’ म्हणण्याची अट घातली. मात्र तरुणीने ती मान्य केली नाही. याविषयीचे व्हॉट्सॲप मेसेजही तरुणाने संबंधित प्राध्यापकाला पाठविले होते.

हे ठरले तात्कालिक कारणपीडित तरुणीने १७ नोव्हेंबर रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. ठाण्यात दिलेला तक्रार अर्ज तरुणीने प्राणिशास्त्र विभागप्रमुखांनाही कुरिअरद्वारे पाठवला. विभागप्रमुखांनी २१ नोव्हेंबर रोजी तरुणाला विभागात बोलावून घेतले. तरुणीच्या तक्रारीमुळे तुझी पीएच.डी.ची नोंदणी रद्द करण्यात येईल, त्याविषयीचे तुझे स्पष्टीकरण कुलसचिवांकडे दे, असे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या गजाननने विभागातून थेट वसतिगृहातील खोली गाठत त्या ठिकाणी फळ्यावर सुसाइड नोट लिहिली. त्यानंतर विज्ञान संस्थेत ही घटना घडली.

१५ सप्टेंबरला आत्महत्येचा प्रयत्नमृत गजानन याने १५ सप्टेंबर रोजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात अंगावर पेट्रोल ओतून घेतले होते. पीडितेच्या हातात काडीपेटी देत आग लावण्यास सांगितले होते. तेव्हा तरुणी घटनास्थळावरून निघून गेली. त्यानंतर तिने मृताच्या वडिलांनाही मुलाला समजावून सांगा, असे फोनवरून सांगितले होते. याविषयीचे रेकॉर्डिंगही पोलिसांना प्राप्त झाले आहे. इतरही दोन वेळा तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तपासात पुढे आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद