एस़टी़विरोधात सावित्रीच्या लेकी

By Admin | Updated: July 11, 2014 00:58 IST2014-07-10T23:57:57+5:302014-07-11T00:58:45+5:30

निलंगा : तालुक्यातील बेंडगा-जामगा-गुंजरगा या गावातील विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी एसटी न थांबवल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडाली

Savitri's lie against ST | एस़टी़विरोधात सावित्रीच्या लेकी

एस़टी़विरोधात सावित्रीच्या लेकी

निलंगा : तालुक्यातील बेंडगा-जामगा-गुंजरगा या गावातील विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी एसटी न थांबवल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडाली असून संतप्त विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकाकडे तक्रार केली आहे़ आमच्यासाठी स्वतंत्र एसटी नाही सोडली तर आंदोलन करु असे या सावित्रीच्या लेकींनी ठणकावून सांगितले़
अनसरवाडा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर विद्यालयात ८ वी ते १० वी इयत्ता साठी गुंजरगा येथून ३६ मुली व ४ मुले, जामगा येथून ११ मुली, २ मुले तर बेंडगा येथून १८ मुली असे एकूण ६५ मुली व ६ मुले शालेय शिक्षण घेण्यासाठी येतात़ यासाठी ते एसटी महामंडळाच्या गाडीतून ये-जा करतात़ मात्र एसटी चालक-वाहकाच्या मुडवर ते विद्यार्थ्यांना येवू द्यायचे की नाही ठरवतात़ कधी विद्यार्थीनींना एसटीत प्रवेश देतात तर कधी न थांबवल्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते़ मंगळवारी निलंगा-बोरसुरी येळणूर चांदोरी-बोरसूरी करून माघारी फिरली़येळणार गुंजरगा-जामगा येथे आली़ गाडीमध्ये जेम-तेम प्रवाशी होते़
मात्र विद्यार्थ्यांची गर्दी पाहून तुम्ही मागच्या गाडीने या असे म्हणून डबल बेल मारली व गाडी विद्यार्थ्यांना न घेताच निघाली़ या विद्यार्थ्यांनी गाडीचा पाठलाग केला व गाडी थांबवण्याची विनंती केली मात्र चालक-वाहकाला याचे काहीच देणे-घेणे नव्हते़ बराच वेळ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या बसच्या प्रतीक्षेत पायपीट करत शाळा गाठली़ व घडलेला प्रकार मुख्याध्यापक एस़एऩशिरमाळे यांना सांगीतला व गुंजरगा येथील मयुरी भोसले, आरती शिंदे, वैशाली शिंदे, शैलजा पाटील, (सर्व १० वी) तर जांमगा येथील मयुरी पवार ८ वी, स्वाती धुमाळ बेंडगा ९ वी, दिपाली धुमाळ ८ वी यांनी निलंगा आगार प्रमुखांची भेट घेऊन बसची व्यवस्था न केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला़ (वार्ताहर)

Web Title: Savitri's lie against ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.