शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

'जैवविविधता प्रकल्प सोडा आधी झाडे वाचवा'; हिमायतबागेत पुन्हा दुर्मिळ वृक्षांची कत्तल

By मुजीब देवणीकर | Updated: August 17, 2022 16:15 IST

३०० एकरहून अधिक परिसर असलेला हा राज्यातील पहिलाच जैवविविधता प्रकल्प ठरणार आहे.

औरंगाबाद: राज्यातील सर्वात मोठा जैवविविधता प्रकल्प म्हणून ऐतिहासिक हिमायत बाग घोषित करण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या पत्ल्विअर सुरु असताना येथे मोठ्याप्रमाणावर वृक्षतोड सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हिमायत बागेच्या संदर्भात न्यायालयात प्रकरण सुरु आहे. न्यायालयाने येथील जैवविविधतेचे रक्षण करण्याच्या दृष्टीने वारसास्थळ घोषित आदेश दिलेले असतानाही बागेतील अनेक दुर्मिळ वृक्षांची कत्तल सुरु असल्याने पर्यावरण प्रेमींनी रोष व्यक्त केला आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अंब्रेला वेलफेअर फाउंडेशनतर्फे एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने हिमायतबाग जैवविविधता वारसास्थळ घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. परभणी कृषी विद्यापीठाने यासंदर्भात महापालिकेकडे रीतसर प्रस्तावही दाखल केला असून यावर पालिकेची बैठकही पार पडली आहे. दरम्यान, एकीकडे जैवविविधता वारसास्थळ घोषित करण्याची प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे हिमायेतबागेत अनधिकृतरित्या वृक्षतोड सुरु आहे. काही दिवसांपासून येथे झाडांची कत्तल सुरु आहे. अनेक वृक्ष मुळासकट तोडली असून काहींच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. याबाबत महापालिकेने हिमायतबाग प्रशासकांना नोटीस बजावली आहे. अनधिकृतरित्या वृक्षतोड केल्याचा खुलासा मागविण्यात आला आहे. दरम्यान, हा न्यायालयीन आदेशाचा अवमान आहे, या प्रकरणी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.  जैवविविधता प्रकल्प सोडा आधी येथील दुर्मिळ वृक्ष तरी वाचवा, अशी मागणी पर्यावरण प्रेमींना केली आहे. 

राज्यातील पहिला मोठा प्रकल्प ऐतिहासिक हिमायत बागेत मागील अनेक दशकांपासून परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत फळ संशोधन केंद्र चालविण्यात येत होते. आता तब्बल ३०० एकरहून अधिक मोठा परिसर जैवविविधता प्रकल्प म्हणून घोषित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ३०० एकरहून अधिक परिसर असलेला हा राज्यातील पहिलाच जैवविविधता प्रकल्प ठरणार आहे. पुण्यात ३४ एकर जागेवर अशा पद्धतीचा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हिमायतबागला वारसा स्थळ घोषित केल्यास शहराच्या वैभवात भर पडेल, पर्यटनाच्या दृष्टीनेही बराच फायदा होईल. मोठी वनसंपदाहिमायबागेत मोठी वनसंपदा आहे. साधारण ३०० ते ४०० वर्षांपूर्वीची झाडे या ठिकाणी आहेत. १२० प्रकारचे प्राणी, पक्ष्यांचा या ठिकाणी वावर आहे. मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकर हिमायतबाग वाचावा, अशी मागणी करीत होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरणAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ