सावरगाव शाळा एका शिक्षकावर
By Admin | Updated: August 3, 2014 01:14 IST2014-08-03T00:43:26+5:302014-08-03T01:14:24+5:30
जालना : परतूर तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर अवघ्या एका शिक्षकाची नियुक्ती

सावरगाव शाळा एका शिक्षकावर
जालना : परतूर तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर अवघ्या एका शिक्षकाची नियुक्ती असल्यामुळेच विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
येथील जिल्हा परिषद शाळेत १ ते ५ पर्यंत वर्ग आहेत. या वर्गात १०० च्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु एवढ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त दोनच शिक्षक नियुक्त आहेत.
परंतु गेल्या १ महिन्यापासून शिक्षिका बाळंतपणाच्या रजेवर आहेत. एकाच शिक्षकावर त्यामुळे शाळेची दारोमदार अवलंबून आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. एकच शिक्षक असल्याने एवढ्या विद्यार्थ्यांना कसे शिकवावे असा प्रश्न पडतो आहे. शाळा सुरू होऊन दीड महिना झाला आहे. परंतु सावगरगावातील विद्यार्थ्यांना अद्यापही शिकविण्यास सुरूवात झालेली नाही.
परिसरातील अनेक शाळांमध्ये अभ्याक्रम शिकविणे झाले आहे. परंतु शिक्षकांअभावी येथील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या संदर्भात गावातील पालकांनी लोकप्रतिनिधी, शिक्षणाधिकारी, जि. प. सदस्य, पं.स.सदस्य यांना वारंवार निवेदन दिली, परंतु अद्यापही शाळेला शिक्षक मिळाला नाही.
भावी पिढीतील विद्यार्थ्यांचा भवितव्याचा विचार करता सावरगाव येथील जि.प.शाळेत अतिरिक्त शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गौतम हरिभाऊ वाहुळे यांनी जिल्ह्य परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. (वार्ताहर)