साहेबराव हिवराळे, औरंगाबाद
सातारा- देवळाई नगर परिषदेची घोषणा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला होणार अशी आशा बळावली होती; परंतु ती आता आठवडाभरानंतरच होईल, असे दिसून येत आहे. मात्र, १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत अनेक प्रश्न ऐरणीवर येणार असल्याने ती वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
मुंबईतून कालच जिल्हा परिषदेच्या वरिष्ठांकडून काही त्रुटींच्या कागदपत्रांची पूर्तता तात्काळ करण्यात आली आहे. ग्रामविकास सचिवाची सही झाली असून, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने घोषणा होईल या आशेने मंत्रालयात तग धरून बसलेल्या शिष्टमंडळाने सांगितले. प्रत्येक जण कामाचे श्रेय घेण्याकडे धडपडत आहे. सर्वांनी एकमुखी ठरावातून नगर परिषदेची मागणी केली होती, आता तीच मंडळी विरोधात असून, कर प्रणाली वाढून जाईल व ग्रामपंचायतीने केलेले काम त्या तुलनेत बऱ्यापैकी असताना मग नगर परिषद कशासाठी, असा सवाल आहे. ग्रामसभेत विविध प्रश्नांवर जोर देण्यात येणार आहे. विरोधी पक्षांनी नगर परिषद नको, महानगरपालिका द्या अन्यथा ग्रामपंचायतच राहू द्या, अशी भूमिका घेतली आहे, तर नगर परिषद लवकर करावी, असा आग्रह सातारावासीयांसह पदाधिकारी आणि नागरिकांनी लावून धरला आहे. देवळाई ग्रामपंचायतीच्या समावेशासह सातारा- देवळाईची घोषणा केव्हा होणार अन् स्वतंत्र, बसस्थानक, पाणीपुरवठा, खेळाचे मैदान, केरकचरा सफाई, रस्ते, ड्रेनेजलाईन इत्यादी प्रश्न प्रामुख्याने सोडविले जातील. सध्या पाणीपुरवठा करणारे टँकर अधूनमधून दांडी मारताना दिसत आहेत. एका वॉर्डात असल्याचे सांगून त्या वॉर्डात टँकरच येत नसल्याने पाण्यासाठी पावसाळ्यातही रांगा आढळून येत आहेत. ग्रामपंचायतीकडे कर्मचारी संख्या अपूर्ण असून, कर्मचारी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याची ओरड आहे.
न.प.च्या घोषणेशिवाय माघार नाही
सर्वांगीण विकासासाठी देवळाई- सातारा नगर परिषदेसाठी २००८ पासून प्रयत्नशील असून, सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री यांच्या स्वाक्षरी व घोषणेचीच प्रतीक्षा आहे. आता माघार नाही, असे माजी सरपंच यशवंत कदम यांनी सांगितले.
कायापालट होईल
सातारा- देवळाई परिसरातील लोकसंख्येच्या तुलनेत ग्रामपंचायतीचे प्रयत्न अपूर्ण ठरतात, परिसराचा कायापालट करण्यासाठी नगर परिषदेच्या घोषणेकडे लक्ष लागले आहे. शासनाने लवकरच भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आहे.
-फिरोज पटेल (माजी सरपंच सातारा ग्रामपंचायत)
जनतेच्या प्रयत्नाला फळ मिळणारच आहे
४रस्ते, पाणी, ड्रेनेज इत्यादी प्रश्न ऐरणीवर असल्याने जनतेला सेवा- सुविधा पुरविण्याचे प्रयत्न तोकडे पडत असल्याने नगर परिषदच गरजेची असून, त्यासाठी आता जोरात प्रयत्न सुरू आहेत. स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त हुकला असला तरी आठवड्यात प्रश्न मार्गी लागणार आहे, असा विश्वास सरपंच करीम पटेल (देवळाई ग्रामपंचायत) व सातारा सरपंच अलका शिरसाट यांनी व्यक्त केला.
सातारा-देवळाई न.प. लांबणीवर
By admin | Updated: August 15, 2014 01:13 IST
साहेबराव हिवराळे, औरंगाबाद सातारा- देवळाई नगर परिषदेची घोषणा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला होणार अशी आशा बळावली होती; परंतु ती आता आठवडाभरानंतरच होईल, असे दिसून येत आहे.
सातारा-देवळाई न.प. लांबणीवर
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}