सराईत घरफोड्या जाळ्यात
By Admin | Updated: May 6, 2017 00:26 IST2017-05-06T00:23:57+5:302017-05-06T00:26:30+5:30
जालना : घरफोडी, चोरी प्रकरणात फरार असलेला आरोपी विजयसिंग कृष्णासिंग भादा याला शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अटक केली आहे.

सराईत घरफोड्या जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घरफोडी, चोरी प्रकरणात फरार असलेला आरोपी विजयसिंग कृष्णासिंग भादा याला शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यासह पथकाने अटक केली आहे.
विजयसिंग भादा हा जालन्यातील गुरूगोविंदसिंगनगर, शिक्कलकरी मोहल्ला येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
एक वर्षापूर्वी कदीम जालना पोलिस ठाणे हद्दीत लागोपाठ दोन घरफोड्या करून तो फरार झाला होता. अखेर शुक्रवारी तो पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची चिन्हे आहेत.