संक्रांतीला लुटले आरोग्याचे वाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:17 IST2021-02-05T04:17:41+5:302021-02-05T04:17:41+5:30
एन-२ परिसरात नुकतेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या काळात प्रामुख्याने घरकाम करणाऱ्या महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात ...

संक्रांतीला लुटले आरोग्याचे वाण
एन-२ परिसरात नुकतेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या काळात प्रामुख्याने घरकाम करणाऱ्या महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. याविषयी माहिती सांगताना उपक्रमाच्या आयोजक योगीता सातपुते व सुधा पै म्हणाल्या की, मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या महिलांना आरोग्याचे अनेक प्रश्न असतात; पण पैशांअभावी किंवा अन्य अडचणींमुळे या महिला कधीही स्वत:हून त्यांची आरोग्य तपासणी करून घेत नाहीत. त्यामुळेच मैत्री ग्रुपच्या सदस्यांसह खास अशा महिलांसाठीच हा उपक्रम राबविण्यात आला.
याअंतर्गत गजानन जोशी यांच्या सहकार्याने प्रत्येक महिलेची रक्त तपासणी करण्यात आली. रक्त तपासणीचे अहवाल आल्यानंतर डॉ. प्राची चव्हाण, डॉ. आनंद यांनी प्रत्येकीला वैयक्तिकपणे काय उपचार करावे, कशी काळजी घ्यावी, आहार कसा असावा, याविषयी मार्गदर्शन केले.
ज्योती यादव, विजया धारूरकर, मृदूल कुलकर्णी, अर्चना कुलकर्णी, रेखा जाखेटे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. अलका मोहेकर, सुनीता भिलवडे, दीपा मानके, स्वाती बोंडे यांची यावेळी उपस्थिती होती. पर्यावरण रक्षणाची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
फोटो ओळ :
पर्यावरण रक्षणाची शपथ घेताना मैत्री ग्रुपच्या सदस्या.