=========
पोहे न दिल्याने मारहाण
औरंगाबाद : मागणी करताच पोहे न दिल्यामुळे एका ग्राहकाने दुकानदारावर सुरीने वार करून जखमी केले. ही घटना उस्मानपुरा येथील उत्सव मंगल कार्यालय चौकात २ डिसेंबर रोजी सकाळी झाली. जालिंदर मोतीराम पठाडे (रा. म्हाडा कॉलनी, प्रतापनगर) यांच्या तक्रारीवरून आरोपी राहुल भालेराव उर्फ नन्ना (३०, रा. रमानगर) याच्याविरुद्ध उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
========
जालना रोडवरून मोटरसायकल पळविली
औरंगाबाद : जालना रोडवरील हॉटेल रामा इंटरनॅशनलसमोर उभी करून ठेवलेली मोटरसायकल (एमएच २१ एजी ४९५) चोरट्यांनी लंपास केली. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या या चोरीविषयी गोपीनाथ पंढरीनाथ धनपुरे (रा. शिवाजीनगर) यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
========
पिसादेवी रस्त्यावरून दुचाकी पळविली
औरंगाबाद : पिसादेवी रस्त्यावरील वृंदावन लॉनजवळ उभी करून ठेवलेली मोटारसायकल (एमएच २० एफ क्यू ९३६७) चोरट्यांनी लंपास केली. ही घटना १ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. याविषयी विजय सखाहरी नवतुरे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.