सुरक्षारक्षकाला चाकू लावून सिटी क्लबमध्ये चंदनचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:06 IST2021-09-23T04:06:19+5:302021-09-23T04:06:19+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असलेल्या सिटी क्लबमध्ये टेनिस, टेबल टेनिस, बिलियर्ड्ससह जिम चालविण्यात येते. याठिकाणी शहरातील नामांकित व्यक्ती खेळण्यासाठी येतात. या ...

सुरक्षारक्षकाला चाकू लावून सिटी क्लबमध्ये चंदनचोरी
जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असलेल्या सिटी क्लबमध्ये टेनिस, टेबल टेनिस, बिलियर्ड्ससह जिम चालविण्यात येते. याठिकाणी शहरातील नामांकित व्यक्ती खेळण्यासाठी येतात. या क्लबच्या आवारामध्ये चंदनाची झाडे आहेत. ही झाडे तोडण्यासाठी सहा चोरटे सोमवारी मध्यरात्री आले होते. तेव्हा एक सुरक्षारक्षक गस्तीवर होता. दोन चोरट्यांनी सुरक्षारक्षकांच्या गळ्याला चाकू लावून बसवून ठेवले. उर्वरित चार जणांनी चंदनाचे झाड तोडले. या झाडाच्या सर्व बाजूंनी पक्क्या विटांनी ओटा बांधण्यात आला होता. हा ओटा तोडून चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेले. त्यानंतर सुरक्षारक्षकाने बेगमपुरा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. उपनिरीक्षक विक्रमसिंग चव्हाण हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेत तपास सुरू केला. मात्र, कोणीही तक्रार न दिल्यामुळे गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती समोर आली. क्लब सचिवांच्या भावाचे निधन झाल्यामुळे तक्रारीला उशीर झाल्याची माहिती क्लबच्या सदस्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.