वाळू तस्कराची उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 17:30 IST2019-05-15T17:28:04+5:302019-05-15T17:30:32+5:30
जेहूर येथील बापू रिंढे हा वाळू तस्करी करत असल्याचे महसूल पथकाच्या निदर्शनास आले होते.

वाळू तस्कराची उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात आत्महत्या
कन्नड़ (औरंगाबाद ) : येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात गळफास घेऊन एका वाळू तस्कराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. बापू कडु रिंढे (२५) असे मृताचे नाव असून त्याच्यावर रविवारी (दि.११ ) गुन्हा दाखल झाला होता.
जेहूर येथील बापू रिंढे हा वाळू तस्करी करत असल्याचे महसूल पथकाच्या निदर्शनास आले होते. त्याच्या विरोधात रविवारी गुन्हा देवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर आज सकाळी त्याने उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांनी कार्यालयात गर्दी केली. बापू याने प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.