शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वाळूच्या हायवाचा हप्ता २० हजार रुपये महिना ! वाहतूक शाखेचा अंमलदार लाच घेताना अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:16 IST

यापूर्वी देखील वाळू वाहतूक करणाऱ्यांसोबत पोलिसांचे संबंध उघड झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांच्या ग्रामीण हद्दीतून वाळूची वाहतूक करण्यासाठी एका हायवासाठी २० हजार रुपये महिना हप्ता लागेल, असा सज्जड दम भरून लाच म्हणून पहिला हप्ता स्वीकारताना पोलिस अंमलदार धीरज धर्मराज जाधव (५०, रा. रविनगर, हडको) याला एसीबीने रंगेहाथ अटक केली. सोमवारी रात्री ११.३० वाजता गाडेगाव फाट्याजवळ यासाठी सापळा रचण्यात आला होता.

धीरज ग्रामीण वाहतूक विभागात अंमलदार आहे. यापूर्वी देखील वाळू वाहतूक करणाऱ्यांसोबत पोलिसांचे संबंध उघड झाले आहेत. तक्रारदार व्यावसायिक अनेक महिन्यांपासून वाळू व्यवसायात सक्रिय आहेत. मात्र, ग्रामीण हद्दीतून हायवाची वाहतूक करण्यासाठी दर महिन्याला एका हायवासाठी २० हजार रुपये लागतील, अशी धमकीवजा अट जाधवने त्याला घातली. व्यावसायिकाने याची थेट एसीबीचे अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. आटाेळे यांच्या सूचनेवरून पोलिस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांनी तक्रारीची खातरजमा केली. त्यात जाधव लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले.

हेडलँपच्या प्रकाशात रचला सापळातक्रारीची खातरजमा होताच सोमवारी सापळा रचण्यात आला. जाधवला संपर्क केल्यावर सोमवारी रात्री ११.३० वाजता वाळूज एमआयडीसी रस्त्यावरील गाडेगाव फाट्याजवळ त्याने जस्ट पॅक इंडस्ट्रियल कंपनीसमोर तक्रारदाराला बोलावले. निरीक्षक चव्हाण, अंमलदार राजेंद्र सिनकर व रवींद्र काळे यांचे पथक अंधारात लपून बसले होते. अंधार असल्याने तक्रारदाराला कारचे हेडलँप सुरू ठेवण्यास सांगितले. जाधवने त्याची चारचाकी दूर उभी करून साध्या वेशात तक्रारदाराच्या जवळ गेला. त्याच्याकडून २० हजार रुपये रोख स्वीकारताच ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने रुमाल खांद्यावर ठेवला आणि इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या पथकाने धाव घेत जाधवच्या मुसक्या आवळल्या. त्याला ताब्यात घेत बीडकीन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधाची खमंग चर्चाया कारवाईमुळे वाळू तस्करी व पोलिसांच्या रेट कार्डविषयी पुन्हा एकदा खमंग चर्चा सुरू झाली. जाधव एकटाच लाचेत अडकल्याने एकटा अंमलदार रेटकार्ड ठरवेल का, असाही प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारीsandवाळू