शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

समर्थनगर वॉर्डाची चार निवडणुकांमध्ये शिवसेनेला साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 17:39 IST

एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या सातव्या मनपा निवडणुकीत वॉर्ड ओबीसी पुरुष अथवा महिलांसाठी राखीव होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देगुलमंडीनंतर शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला वॉर्डशिवसेनेकडून हिसकावून घेण्यासाठी भाजप तगड्या उमेदवाराच्या शोधात

- मुजीब देवणीकर औरंगाबाद : महापालिकेच्या सलग सहा निवडणुकांमध्ये समर्थनगर वॉर्डाने चार वेळेस शिवसेनला कौल दिला आहे. एकदा प्रदीप जैस्वाल यांच्या शहर प्रगती आघाडीला यश मिळाले. अपक्षाला एकदा या वॉर्डाने संधी दिलेली आहे. एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या सातव्या मनपा निवडणुकीत वॉर्ड ओबीसी पुरुष अथवा महिलांसाठी राखीव होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

शिवसेनेला अनुकूल असलेला हा वॉर्ड सेनेकडून हिस्कावून घेण्यासाठी भाजप यावेळी तुल्यबळ उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. गुलमंडीनंतर शिवसेनेचे लक्ष हे समर्थनगर वॉर्डाकडे असते. २०१५ मध्ये या वॉर्डातून माजी खा. चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव ऋषी खैरे निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे पवन डोंगरे यांचा ९४७ मतांनी पराभव केला होता. माजी उपमहापौर किशोर थोरात यांना ५३८, तर प्रांतोष वाघमारे यांनी ६३२ मते मिळविली होती. वॉर्ड अनुसूचित जातींसाठी राखीव होता. त्यापूर्वी २००५ मध्ये खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी वॉर्ड राखीव होता. ओबीसी पुरुष किंवा महिला असे आरक्षण वॉर्डावर कधीच पडले नाही. त्यामुळे यंदा ओबीसीसाठी आरक्षण येईल, असा कयास आहे. आरक्षणामुळे नागेश्वरवाडीच्या नगरसेविका कीर्ती शिंदे या वॉर्डात येण्याची शक्यता आहे. नागेश्वरवाडी वॉर्डावरही आरक्षणाचे ढग गडद बनले आहेत. 

आ. प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव ऋषी जैस्वाल यांनीही समर्थनगरसाठी तयारी सुरू केली आहे. वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी असल्यास अनेक जण निवडणूक रिंगणात दिसून येतील. यामध्ये भाजपकडून प्रामुख्याने समीर राजूरकर, अनिल मकरिये निवडणूक लढतील. सर्व इच्छुकांचे लक्ष सध्या आरक्षणाकडे लागले आहे. मागील अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवण्यासाठी वॉर्ड शिवसेनेकडेच राहावा यादृष्टीने जोरदार प्रयत्न होणार आहेत. 

गुलमंडीनंतर सेनेसाठी समर्थनगर वॉर्ड तेवढ्याच प्रतिष्ठेचा आहे. मागील अनेक वर्षांपासून सेनेकडे असलेला हा वॉर्ड आपल्याकडे ओढून घेता येऊ शकतो का, यादृष्टीने भाजपने चाचपणी सुरू केली आहे. तुल्यबळ उमेदवार देऊन ही राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची जास्त शक्यता आहे. नवीन वॉर्ड रचना कशी असेल, यावरही पुढील गणित अवलंबून राहणार आहे. सध्या वॉर्डाची रचना शिवसेनेसाठी अत्यंत पोषक आहे. यामध्ये भोईवाडा परिसराचा समावेश झालेला असल्यास राजकीय गणित बिघडण्याचीही शक्यता आहे. या वॉर्डाचे नेतृत्व केलेल्या बहुतांश मंडळींचा राजकीय आलेख चढत्या स्वरूपाचा राहिलेला आहे. त्यामुळे समर्थनगरकडे राजकीय मंडळींचा सर्वाधिक कल आहे.

समर्थनगर वॉर्डाचे आजपर्यंतचे नगरसेवक१९८८- स्व. मोरेश्वर सावे (अपक्ष)१९९५- माया लाडवाणी (शिवसेना)२०००- आनंद तांदूळवाडीकर (शिवसेना)२००५- कला बोरामणीकर (शिवसेना)२०१०- समीर राजूरकर (शहर प्रगती आघाडी)२०१५- ऋषी खैरे (शिवसेना) 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना