पोस्टमनच्या कार्याला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:03 IST2021-08-23T04:03:56+5:302021-08-23T04:03:56+5:30

- साहेबराव हिवराळे- औरंगाबाद : ‘राखी का मतलब है प्यार भैय्या’, या गाण्याच्या ओळी गुणगुणत पोस्टमनने जिल्ह्यातील ५ हजार ...

Salute to the work of the postman | पोस्टमनच्या कार्याला सलाम

पोस्टमनच्या कार्याला सलाम

- साहेबराव हिवराळे-

औरंगाबाद : ‘राखी का मतलब है प्यार भैय्या’, या गाण्याच्या ओळी गुणगुणत पोस्टमनने जिल्ह्यातील ५ हजार टपालांपैकी बहिणींनी पाठविलेल्या २७३० राख्या भावांच्या हाती सोपविल्या. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच हातात राखी पडल्यामुळे भावांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. रविवार हा सुटीचा दिवस असतानाही पोस्टमनने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल अनेकांनी त्यांच्या कार्याला सलाम केला.

गेल्या तीन दिवसांपासून एस.टी., खासगी बसेस आणि रेल्वेला प्रवाशांची गर्दी होती. काही कारणांमुळे अनेक बहिणींना भावाकडे जाता आले नाही. अनेक बहिणी टपाल कार्यालयामार्फत राख्या पाठवितात; परंतु अनुभव असा आहे की, रक्षाबंधनाच्या सणानंतरच भावांच्या हाती राख्या पडतात. काहींचे पत्ते सापडत नाहीत, सुट्टीमुळे उशिरा राखी पोहोचणे हे नेहमीचेच झाले आहे. यंदा मात्र, औरंगाबाद टपाल कार्यालयाने विशेष बाब म्हणून सुट्टीच्या दिवशीही टपाल सेवा सुरू ठेवली. त्यामुळे ऐन रक्षाबंधन सणाच्या दिवशीच अनेक भाऊरायांच्या हाती राखी पडल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

पोस्टाचे प्रवर अधीक्षक जी. हरी प्रसाद यांच्या आदेशानुसार रविवारी सुटीच्या दिवशीही राख्यांच्या टपाल वितरणाचा हा उपक्रम पोस्टमनमार्फत राबवून घेण्यात आला. साधे पोस्ट, स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्टाने आलेल्या सर्व २७३० राख्या दुपारी तीन वाजेपर्यंत वाटप करण्यात आल्या.

- आर. डी. कुलकर्णी, वरिष्ठ पोस्टमास्तर, औरंगाबाद.

कॅप्शन...

रविवारी सुटीच्या दिवशीही बहिणींनी पाठविलेल्या राख्यांचे वितरण करताना पोस्टमन.

Web Title: Salute to the work of the postman