शहीद किरण थोरात यांना औरंगाबाद विमानतळावर सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 19:38 IST2018-04-12T19:37:24+5:302018-04-12T19:38:52+5:30

 औरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र शहीद किरण पोपटराव थोरात यांचे पार्थिव सायंकाळी ६.३० वाजता लष्कराच्या विशेष विमानाने औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.

Salute to Shahid Kiran Thorat at the Aurangabad airport | शहीद किरण थोरात यांना औरंगाबाद विमानतळावर सलामी

शहीद किरण थोरात यांना औरंगाबाद विमानतळावर सलामी

औरंगाबादऔरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र शहीद किरण पोपटराव थोरात यांचे पार्थिव सायंकाळी ६.३० वाजता लष्कराच्या विशेष विमानाने औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. यावेळी लष्कराच्या तुकडीतर्फे त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून  सलामी देण्यात आली. 

जम्मू-काश्मिरात पूंछ व राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बुधवारी भारतीय चाैक्यांवर गोळीबार केला. यात वैजापूर तालुक्यातील फरीदाबाद येथील रहिवासी जवान किरण थोरात यांना वीरमरण आले. त्याचे पार्थिव विमानतळावर आणण्यात येणार असल्याने मानवंदना देण्यासाठी दुपारपासूनच चिकलठाणा विमानतळावर नागरिक दाखल होत होते. लष्करातर्फे पुष्पचक्र वाहून सलामी देण्यात आली. यावेळी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, महापौर नंदकुमार घोडेले, आ. इम्तियाज जलील, प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम,  जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर , ब्रिगेडियर डी.के. पात्रा आदी उपस्थित आहेत.

Web Title: Salute to Shahid Kiran Thorat at the Aurangabad airport