‘अंतिम’मध्ये भिडले सलमान आणि आयुष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:06 IST2020-12-22T04:06:01+5:302020-12-22T04:06:01+5:30

गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि आयुष शर्माचा ‘अंतिम- द फायनल ट्रूथ’ सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाचं शूटिंग सुरू ...

Salman and Ayush clash in 'Antim' | ‘अंतिम’मध्ये भिडले सलमान आणि आयुष

‘अंतिम’मध्ये भिडले सलमान आणि आयुष

गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि आयुष शर्माचा ‘अंतिम- द फायनल ट्रूथ’ सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाचं शूटिंग सुरू असून, आता याचे टीझर रिलीज करण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा टीझर व्हायरल झाला आहे. यातील खासकरून आयुष शर्माचा लूक पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. टीझरमध्ये एका फाइट सीनचा भाग आहे ज्यात सलमान खान आणि आयुष शर्मा दोघेही शर्टलेस असून, आपसात भिडताना दिसत आहेत. आयुष शर्मा पहिल्यांदा अशा बॉडी बिल्डर लूकमध्ये दिसत आहे. आयुष शर्माने ‘लवयात्री’ सिनेमातून डेब्यू केले होते. ज्यात तो एका चॉकलेट बॉयच्या भूमिकेत होता. ‘अंतिम- द फायनल ट्रूथ’ सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करीत आहेत, तर सिनेमा सलमान खान प्रॉडक्शनखाली तयार होत आहे.

‘तारक मेहता...’मध्ये ‘या’ कलाकाराची होणार रिएंट्री

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील नट्टू काका हे प्रेक्षकांचे प्रचंड आवडते आहेत. ही भूमिका घनश्याम नायक साकारत असून, त्यांच्यावर काही महिन्यांपूर्वी एक सर्जरी करण्यात आली होती. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून चित्रीकरण करीत नव्हते. मात्र, आता ते परतणार आहेत. घनश्याम नायक यांनी सांगितले आहे की, मी १६ मार्चला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे चित्रीकरण केले होते; पण त्यानंतर तब्येतीमुळे मला काम करणे जमले नाही. आता मी ठणठणीत असून, १६ डिसेंबरपासून मी पुन्हा मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. बरोबर नऊ महिन्यांनंतर मी कॅमेऱ्याच्या समोर उभा राहिलो आहे.

Web Title: Salman and Ayush clash in 'Antim'