रस्तोरस्ती फटाक्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST2020-11-12T07:28:59+5:302020-11-12T07:28:59+5:30

शहरातील अंतर्गत रस्त्यावर व गल्लीबोळात फटाक्यांची बिनधास्त विक्री सुरू आहे. लसूण फटाक्यांपासून ते सुतळी बॉम्ब पर्यंतचे लहान- मोठे फटाके ...

Sale of street firecrackers | रस्तोरस्ती फटाक्यांची विक्री

रस्तोरस्ती फटाक्यांची विक्री

शहरातील अंतर्गत रस्त्यावर व गल्लीबोळात फटाक्यांची बिनधास्त विक्री सुरू आहे. लसूण फटाक्यांपासून ते सुतळी बॉम्ब पर्यंतचे लहान- मोठे फटाके विकल्या जात आहेत. काही जण हातगाडीवर फिरून हे फटाके विकत आहेत.

फटाके विक्रीसाठी काही ठराविक मैदान ठरवून देण्यात आले आहेत. अन्य ठिकाणी फटाके विकण्यास बंदी आहे. पण लहान मुलांना पुढे करून भर बाजारपेठेत फटाके विकले जात आहे. हातगाडीवरील फटाक्यांना चुकून आग लागली तर बाजारपेठेत अनर्थ घडू शकतो, अशी भीती आहे.

या फटाके विक्रेत्या मुलांच्या पालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Sale of street firecrackers