शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

९९ अर्जांची विक्री

By admin | Updated: September 20, 2014 23:39 IST

हिंगोली : विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली असून पहिल्याच दिवशी हिंगोली, कळमनुरी व वसमत मतदारसंघामध्ये एकूण ९९ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे.

हिंगोली : विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली असून पहिल्याच दिवशी हिंगोली, कळमनुरी व वसमत मतदारसंघामध्ये एकूण ९९ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे.हिंगोली मतदारसंघातील १५ व्यक्तींनी ३० नामनिर्देशनपत्रे नेली असून कळमनुरी मतदारसंघात ७ व्यक्तींनी १७ अर्ज तर वसमत मतदारसंघात १३ व्यक्तींनी ५२ अर्ज नेले आहेत. पहिल्या दिवशी एकूण ९९ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी केली जात आहे. १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार असून ५ संवेदनशील केंद्रावर विशेष सुरक्षा तैनात राहणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी खुदाबक्ष तडवी यांनी पत्रपरिषदेत दिली आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राम गगरानी, तहसीलदार विद्याचरण कडवकर, तहसीलदार मेंडके यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. हिंगोली मतदारसंघात सेनगाव तालुक्यातील १३३ गावांसाठी १७२ मतदान केंद्र व हिंगोली तालुक्यातील ८३ गावांसाठी १५० केंद्र राहणार आहेत. एकूण २१६ गावांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात ३२२ मतदान केंद्र असून हिंगोलीतील ३ तर सेनगाव व गोरेगावचा समावेश संवेदनशील केंद्रांमध्ये होतो. १ लाख ४५ हजार ९२२ पुरूष व १ लाख २८ हजार ६४३ महिलांना एकूण २ लाख ७४ हजार ५६५ ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. ४० क्षेत्रीय अधिकारी नेमून वाढोणा, येलदरी व कनेरगाव नाका येथे चेकपोस्ट स्थापन केले आहेत. ३ भरारी पथके असून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)