१२५ अर्जांची विक्री; २५ जणांची उमेदवारी दाखल
By Admin | Updated: February 8, 2015 00:10 IST2015-02-08T00:07:15+5:302015-02-08T00:10:40+5:30
\उस्मानाबाद : तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे.

१२५ अर्जांची विक्री; २५ जणांची उमेदवारी दाखल
\उस्मानाबाद : तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. बुधवारपासून अर्ज विक्रीला सुरूवात झाली असून चार दिवसांत सव्वाशे अर्जांची विक्री झाली असून २५ जणांनी अर्ज दाखलही केले.
केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. बुधवारपासून निवडणूक विभागाकडून नामनिर्देशन अर्जांची विक्री व स्विकृती प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज विक्रीच्या चौथ्या दिवशी थोडेथोडके नव्हे, तर तब्बल १२५ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे. तर २५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखलही केले आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी दिली. उमेदवारी दाखल करण्यासाठी ९ फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. परंतु, रविवारी कार्यालयाला सुटी आहे. त्यामुळे इच्छुकांच्या हातात आता अवघा एकच दिवस उरला असल्याने नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी शनिवारी लगबग दिसून आली. कारखान्याचे विद्यमान चेअरमन अरविंद गोरे यांनी कारखाना ताब्यात ठेवण्यासाठी तगडी ‘फिल्डिंग’ लावली आहे. तर दुसरीकउे विरोधही सरसावले आहेत. (प्रतिनिधी)