सखी मंचचा ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’
By Admin | Updated: July 23, 2016 01:18 IST2016-07-23T00:32:11+5:302016-07-23T01:18:17+5:30
पहिला पाऊस पडून गेलेला आहे. निसर्गाने हिरवाकंच शालू पांघरला असून धरणीमाता पावसाने चिंब झाली आहे.

सखी मंचचा ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’
औरंगाबाद : आला पुन्हा तो नव्यानं.. ओला मातीचा सुगंध..
मन झाले एकवार.. पुन्हा बेहोष बेधुंद..
पहिला पाऊस पडून गेलेला आहे. निसर्गाने हिरवाकंच शालू पांघरला असून धरणीमाता पावसाने चिंब झाली आहे. रसिकतेला आव्हान देणाऱ्या या रोमांचक वातावरणात हळूच सुरेल तान कानावर पडावी अन् मन बेभान होऊन नाचू गाऊ लागावे, असे वाटते. नेमका या वातावरणाचा रंग ओळखून, आपल्या असंख्य सखींच्या मनातील भाव ओळखून पुन्हा एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंचने ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’ हा कार्यक्रम आणला आहे.
गोवा आणि महाराष्ट्रात ज्याप्रमाणे लोकमत सखी मंचने आपल्या सदस्यांसाठी विविधरंगी कार्यक्रम देऊन त्यांच्या मनात घर केलं, त्याचप्रमाणे कलर्सने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कलर्स व लोकमत सखी मंच आपल्या भेटीला येत आहेत. या कार्यक्रमात असणार आहेत आपल्या मनातली गाणी, पाऊस गाणी आणि सोबतच नृत्याची ‘झलक दिखला जा’ स्पर्धा. या नृत्य स्पर्धेत केवळ १० स्पर्धकांना प्रवेश घेता येणार आहे.
पुन्हा एकदा कलर्स चॅनलवर ३० जुलै, शनिवारपासून रात्री १० वा. ‘झलक दिखला जा हॉट है’ हा शो सुरू होणार आहे. यावेळचे मुख्य आकर्षण म्हणजे २००६ ची मिस युनिव्हर्स श्रीलंका आणि सुप्रसिद्ध मॉडेल- अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस या कार्यक्रमाची सेलिब्रिटी जज असणार आहे.
तिच्या सहभागाने या कार्यक्रमाला आलेले एक ग्लॅमरस आणि सिझलिंग स्वरूप या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असेल. याशिवाय सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक करण जोहर, कोरिओग्राफर गणेश हेगडे हे सुद्धा परीक्षकांच्या भूमिकेत धमाल करताना दिसणार आहेत. एकूण १२ सेलिबिटीज या कार्यक्रमात सहभागी होणार असून यात सुरवीन चावला, करिश्मा तन्ना, शक्ती अरोरा, अर्जुन बिजलानी, गौरव गेरा (चुटकी फेम), पूनम शहा- प्रियंका शहा (जुळ्या बहिणी), हरपालसिंग सोखी (शेफ), हेली शाह, नोरा फतेही, सलमान युसूफ खान, सिद्धांत गुप्ता आणि शांतनू माहेश्वरी आदींचा समावेश आहे.
बहुरंगी करमणूक
दि. २५ जुलै रोजी सायं. ४: ३० वा. संत तुकाराम नाट्यगृह, सिडको येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चला तर मग, पावसाच्या गाण्यांसोबतच कर्णमधुर संगीत आणि नृत्याच्या दिलखुलास ठेक्यासोबत ‘झलक दिखला जा’ चे स्वागत करूया.
४या कार्यक्रमाचा एक वेगळा ‘कलर’ आम्ही घेऊन येत आहोत, ज्यात असणार आहे डान्स, मस्ती, मनोरंजन आणि धमाल. नृत्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी ९८५०४०६०१७ या क्रमांकावर स. ११ ते सायं. ५ या वेळेत संपर्क साधावा.