शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

जप्त वाळूचा होणार लिलाव...!

By admin | Updated: August 13, 2015 00:20 IST

जालना : जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात अवैध वाळू उपसा व अवैध वाहतुकीवर काही दिवसांपासून केलेल्या कारवाईत सुमारे ८ हजार ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.

जालना : जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात अवैध वाळू उपसा व अवैध वाहतुकीवर काही दिवसांपासून केलेल्या कारवाईत सुमारे ८ हजार ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. या साठ्याचा लवकरच लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जालना जिल्ह्यात विशेषत: अंबड व घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदी किनाऱ्यावरील विविध गावांतील शिवारातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. महसूल प्रशासनाने वेळोवेळी यावर कारवाई केलेली आहे. या कारवाईतील मोठा साठा त्या त्या भागात साठवून ठेवण्यात आलेला आहे. घनसावंगी तालुक्यातील भादली येथील गायरान जमिनीवर नदीकाठावर तसेच सदानंद महाराज मंदिर परिसरात सुमारे अडीच हजार ब्रास वाळूचा साठा ठेवलेला आहे. अंबड तालुक्यातील गोंदी परिसरात विविध ठिकाणी सुमारे साडेपाच हजार ब्रास वाळूचा साठा आहे. याची किमंत सुमारे ५० लाखांवर आहे. त्याच्या लिलावातून प्रशासनाला मोठा महसूल प्राप्त होणार असून, १२ आॅगस्ट पासून लिलावाच्या निविदेची प्रकिया सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)जालना तहसील कार्यालयाने मागील काही महिन्यांत अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई करून वाळू जप्त केली होती. ही वाळू तहसील कार्यालय आवारात मोठ्या प्रमाणात जमा झालेली आहे. अंबड आणि घनसावंगी येथील जप्त वाळूचा लिलाव झाल्यानंतर जालन्यासह जिल्ह्यातील अन्य काही ठिकाणी जप्त केलेल्या वाळूचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)