बाजारपेठ उघडण्यासाठी व्यापारी महसंघाचे लोकप्रतिनिधीला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:04 IST2021-05-31T04:04:36+5:302021-05-31T04:04:36+5:30

खासदार भागवत कराड, माजी खा. चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार सतीश चव्हाण, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय ...

Sakade to the people's representative of the trade federation to open the market | बाजारपेठ उघडण्यासाठी व्यापारी महसंघाचे लोकप्रतिनिधीला साकडे

बाजारपेठ उघडण्यासाठी व्यापारी महसंघाचे लोकप्रतिनिधीला साकडे

खासदार भागवत कराड, माजी खा. चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार सतीश चव्हाण, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, आमदार अंबादास दानवे या लोकप्रतिनिधींची भेट घेण्यात आली. निवेदन देऊन त्यांना व्यापाऱ्यांच्या अडचणी सांगितल्या. १ जूनपासून दुकाने उघडण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करा, असेही यावेळी नमूद करण्यात आले. तसेच लॉकडाऊन काळात सील केलेले दुकानांना नाममात्र शुल्क आकारून सुरू करण्याची परवानगी द्यावी. अनेकांचा व्यवसाय बुडाल्याने मनपाचा मालमत्ता कराचे व्याज व दंड कमी करावा. वीजबिलात सूट द्यावी, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश होता. शिष्टमंडळात मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालानी व जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

Web Title: Sakade to the people's representative of the trade federation to open the market