सफई कामगाराची प्रेतयात्रा पालिका कार्यालयावर

By Admin | Updated: September 10, 2014 00:00 IST2014-09-09T23:40:33+5:302014-09-10T00:00:28+5:30

सेलू : आजारी पडलेल्या ऩ प़च्या सफाई कामगाराला वेतन न झाल्याने उपचार करता आले नाहीत़ त्यामुळे मृत्यू झालेल्या कामगाराच्या संतप्त नातेवाईकांनी सोमवारी प्रेतयात्रा ऩ प़ कार्यालयावर आणली़

The Safai Koshagara funeral procession office on the office | सफई कामगाराची प्रेतयात्रा पालिका कार्यालयावर

सफई कामगाराची प्रेतयात्रा पालिका कार्यालयावर

सेलू : आजारी पडलेल्या ऩ प़च्या सफाई कामगाराला वेतन न झाल्याने उपचार करता आले नाहीत़ त्यामुळे मृत्यू झालेल्या कामगाराच्या संतप्त नातेवाईकांनी सोमवारी सकाळी ११ वाजता प्रेतयात्रा ऩ प़ कार्यालयावर आणली़ त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली़
ऩ प़ च्या सफाई विभागात काम करणाऱ्या सखाराम श्रीरंग चव्हाण या कामगाराचा ७ सप्टेंबर रोजी रात्री मृत्यू झाला़ कामगाराचे दोन महिन्यांचे वेतन थकले होते़ त्यातच सखाराम चव्हाण हे आजारी पडले़ उपचारासाठी खर्च करणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते़ दुर्दैवाने या कर्मचाऱ्याचा रविवारी रात्री मृत्यू झाला़ संतप्त झालेल्या कामगाराच्या नातेवाईकांनी व सहकाऱ्यांनी त्यांची प्रेतयात्रा ऩ प़ कार्यालयावर आणली व पालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रेत ठेवले़ त्यामुळे एकच गोंधळ उडाला़ दरम्यान, नगराध्यक्ष सुरेश कोरडे व काँग्रेसचे शहराध्यक्ष रघुनाथ बागल यांनी उपस्थित मयत कामगाराच्या नातेवाईकांचे सांत्वन करून त्यांच्या वारसाला नोकरी देण्याची लेखी हमी दिल्यानंतर प्रेतयात्रा स्मशानभूमीकडे वळली़ वेळेवर वेतन होत नसल्यामुळे सफाई कामगारांना उदरनिर्वाह करणे कठीण जाते़ त्यातच आजारी पडल्यानंतर उपचारालादेखील त्यांच्याकडे पैसे नसतात़ त्यामुळे ऩप़ कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार करावेत, अशी मागणी कामगारांमधून होत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The Safai Koshagara funeral procession office on the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.