शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

‘साडेसाती’ ही ज्योतिषशास्त्रातील भाकडकथा

By admin | Updated: December 28, 2014 01:24 IST

औरंगाबाद : अंधश्रद्धेमध्ये ज्योतिषशास्त्रातील ‘कर्मकांड’ आले आहे. त्यास आमचा विरोध आहे. यात साडेसाती, कालसर्पयोग, नारायणनागबळी, या भाकडकथा आहेत.

औरंगाबाद : अंधश्रद्धेमध्ये ज्योतिषशास्त्रातील ‘कर्मकांड’ आले आहे. त्यास आमचा विरोध आहे. यात साडेसाती, कालसर्पयोग, नारायणनागबळी, या भाकडकथा आहेत. या अंधश्रद्धा ज्योतिषशास्त्रातून गेल्या पाहिजे, याकरिता आमचा लढा सुरू आहे. यासाठी आम्ही प्रा. श्याम मानव यांच्यासोबत काम करण्यास तयार आहोत. या प्रश्नी २०१९ पर्यंत ते आमच्यासोबत असतील, अशी भविष्यवाणी बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी येथे केली.२० व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनात ते बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन खा.चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाले. शुक्रवारी शहरात आयोजित एका कार्यक्रमात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा.श्याम मानव यांनी ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र पूर्णत: थोतांड असल्याचा आरोप केला होता. हाच धागा पकडत जकातदार यांनी स्पष्ट केले की, ज्योतिषशास्त्र हे थोतांड नाही. कोणतेही शास्त्र नियमावर आधारित असते, तसेच ज्योतिषशास्त्र नियमावर आधारित आहे. ज्योतिर्गणितातून ज्योतिष विज्ञानाची निर्मिती झाली. यासाठी गॅलिलिओने दोन भाग पाडले होते. ग्रहाचा परिणाम पृथ्वीवर मनुष्य, प्राणीमात्रावर होतो हे सिद्ध झाले आहे. विज्ञानाच्या कसोटीवर पाहिले तर सूर्य तळपत असतो. त्याची किरणे डोक्यावर पडतात तेव्हा त्याचा किती परिणाम होतो ही टक्केवारी ज्योतिषशास्त्राने शोधून काढली आहे. ज्योतिषशास्त्र अंधश्रद्धा पसरवीत नाही. मनुष्याला प्रयत्नवादी बनवितो, दैववादी बनवत नाही. प्रास्ताविक मधुकांत कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. मालती शर्मा यांनी केले. या दोनदिवसीय अधिवेशनासाठी राज्यभरातून ज्योतिषी येथे आले आहेत. अधिवेशनात पुरस्कार देण्यात आले. यात य. न. मग्गीरवार यांना जीवन गौरव पुरस्कार, मधुकर कोनार्डे यांना विशेष गौरव पुरस्कार, तर भूषण रत्नाकर यांना युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस ज्योतिष अधिवेशनाचा उद्या २८ रोजी शेवटचा दिवस आहे. वरद गणेश मंदिरातील सभागृहात सकाळी ९.३० वाजेपासून सत्राला सुरुवात होणार आहे. समारोपाच्या सत्राला सायंकाळी ५.४५ वाजता सुरुवात होईल. यावेळी अध्यक्षस्थान डी. वाय. पाटील अ‍ॅस्ट्रॉलॉजी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. रमणलाल शहा भूषविणार आहेत.