शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

दुखद! सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील समृद्धी वाघिणीने घेतला अखेरचा श्वास

By मुजीब देवणीकर | Updated: April 13, 2024 12:48 IST

प्राणी संग्रहालयात सुरुवातीला आणण्यात आलेल्या दीप्ती आणि गुड्डू या वाघांच्या जोडीने २०१० मध्ये समृद्धी वाघिणीला जन्म दिला.

छत्रपती संभाजीनगर: मागील आठवडाभरापासून महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील पिवळी वाघीण समृद्धी आजारी होती. किडनी व्यवस्थित कार्य करत नसल्याने तिने अन्न सोडले होते. ती उपचारासही प्रतिसाद देत नव्हती. चार दिवसांपासून तिला सलाइनद्वारेच पोषक अन्नद्रव्य दिले जात होते. मात्र, आज पहाटे तिने अखेरचा श्वास घेतला.

प्राणी संग्रहालयात सुरुवातीला आणण्यात आलेल्या दीप्ती आणि गुड्डू या वाघांच्या जोडीने २०१० मध्ये समृद्धी वाघिणीला जन्म दिला. त्यानंतर समृद्धी वाघिणीने आतापर्यंत तीनदा दहा बछड्यांना जन्म दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून समृद्धीचे खाणे कमी झाल्यामुळे ती आजारी पडली. त्यामुळे तिला ४ एप्रिलपासून प्राणी संग्रहालयातील दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले. समृद्धीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असता, त्यात किडनी फंक्शन चाचणीमध्ये क्रिएटिन आणि ब्लड युरियामध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले. 

दरम्यान, रक्ताच्या अहवालानुसार प्राणी संग्रहालय पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार समृद्धी वाघिणीवर उपचार करण्यात आले. यामध्ये सलाईन व प्रतिजैविक इंजेक्शन देण्यात येत आले. मात्र, माञ ती उपचारास प्रतिसाद देत नव्हती. समृद्धीच्या देखभालीसाठी काळजीवाहक नेमून तिच्यावर २४ तास लक्ष ठेवून होते. माञ तिच्या तब्येतील सुधारणा होत नसल्याचे दिसून आले. यादरम्यान आज पहाटे तीन वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. दुपारी एक ते दीड वाजेदरम्यान प्राणिसंग्रहालयात तिचा अंत्यविधी केला आणार असल्याचे पालिकेने कळवले आहे. वाघांचे आयुष्य सरासरी २० ते २२ वर्षांपर्यंत असते. समृद्धी वाघिण चौदा वर्षांची होती.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTigerवाघ